'ईडी मला अटक करणार आणि मी अटक करुन घेणार' ED ने ताब्यात घेताच Sanjay Raut यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 31, 2022 | 18:06 IST

Sanjay Raut reaction after ED action: ईडीच्या अधिकाऱ्यांची टीम रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाली आणि ९ तासांनंतर संजय राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. 

Sanjay raut first reaction after detained by ed said ed will arrest me and i will get arrested
'ईडी मला अटक करणार आणि मी अटक करुन घेणार' ED ने ताब्यात घेताच Sanjay Raut यांची पहिली प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • ९ तासांनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना घेतलं ताब्यात
  • मी कारवाईला घाबरत नाही, काहीही झालं तरी शिवसेना सोडणार नाही - संजय राऊत
  • शिवसेनेला कमजोक करण्यासाठी षडयंत्र सुरू आहे - संजय राऊत 

Sanjay Raut said I will not leave shiv sena: मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी दाखल झाली आणि ९ तासांनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. भांडूप येथील संजय राऊत यांच्या राहत्या घरातून त्यांना ईडीने ताब्यात घेतले आणि त्यानंतर ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. ईडी कार्यालयाबाहेर आणले असता संजय राऊत यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. (Sanjay raut first reaction after detained by ed said ed will arrest me and i will get arrested)

काय म्हणाले संजय राऊत? 

शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. सर्वांना माहिती आहे की, संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण संजय राऊत शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्रासोबत बेईमानी करणार नाही. मला ईडी अटक करणार आहे आणि मी अटक करुन घेणार आहे.

फक्त शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमकूवत करण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे, मी लढणार... आम्ही लढू... महाराष्ट्र आणि शिवसेना इतकी कमकुवत नाहीये. खोटी कागदपत्रे, खोटे पुरावे बनवत ही कारवाई केली जात आहे. केवळ महाराष्ट्राला आणि शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी हे केलं जात आहे असंही संजय राऊत म्हणाले.

अधिक वाचा : Viral Audio : ७० सेकंदात शिव्यांचा पाऊस, टीम संजय राऊत कायदेशीर कारवाईच्या विचारात

शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे

महाराष्ट्र कमजोर होत आहे.... पेठे वाटा, अरे बेशरम लोक आहात तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं म्हणत शिंदे गटातील आमदारांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांचं ट्विट

संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये म्हटलं होतं, तुम्ही त्या व्यक्तीला हरवू शकत नाही. जो कधीही हार मानत नाही, झुकणार नाही... जय महाराष्ट्र.

पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट. म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ९ विकासकांना ९०१ कोटी रुपयांना एफएसआय विकला.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली १३८ कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली. एकूण १०३९.७९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. १०० कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले. प्रवीण राऊत यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे हस्तांतरित केली. ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना दिल्याचं समोर आलं. 

पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरूंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी