Sanjay Raut: राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. कारण, संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दावाच्या संदर्भात कोर्टाने हे वॉरंट काढलं आहे. शिवडी दंडाधिकारी कोर्टाकडून हे अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. (Sanjay Raut in trouble as sewri court issued non bailable warrant in medha kirit somaiya defamation case)
मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकत शिवडी दंडाधिकारी कोर्टात तक्रार दिली आहे. या खटल्याच्या सुरुवणीस वारंवार तारखा येऊन सुद्धा संजय राऊत कोर्टात उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल म्हणजेच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावा अशी मागणी सोमय्यांच्यावतीने करण्यात आली होती.
Sewree Court issued Non Bailable Warrant against #SanjayRaut for not attending the court — Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 6, 2023
Court recorded Complainant Medha Somaiya statement for an hour, in Dr Medha Kirit Somaiya defamation case against Sanjay Raut
Next hearing 24 Jan@BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
हे पण वाचा : दररोज चिकन खाल्याने काय होते?
सोमय्या यांनी केलेल्या या मागणीचा विचार करुन शिवडी दंडाधिकारी कोर्टाने शुक्रवारी (6 जानेवारी 2023) अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. या सुनावणीला जर पुन्हा संजय राऊत कोर्टात हजर राहीले तर त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द होऊ शकतं. मात्र, जर संजय राऊत हे पुन्हा सुनावणीसाठी कोर्टात गैरहजर राहीले तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्राच्या संदर्भातील पुढील प्रक्रिया करण्यात येऊ शकते.
हे पण वाचा : हिवाळ्यात दही खावे की नाही? वाचा...
संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांवर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. कथित 100 कोटी रुपयांच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नाहीये असा दावा करत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.