Kirit Somaiya: संजय राऊत फक्त आरोप करतात, परंतु पुरावे देऊ शकले नाहीत - किरीट सोमय्या 

मुंबई
Updated Apr 07, 2022 | 15:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kirit Somaiya On Sanjay Raut | शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ५८ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप केला होता. दरम्यान आता या आरोपाला सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले.

 Sanjay Raut only makes allegations but could not give evidence says Kirit Somaiya
संजय राऊत फक्त आरोप करतात पुरावे देऊ शकले नाहीत - सोमय्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संजय राऊत फक्त आरोप करतात पुरावे देऊ शकले नाहीत - सोमय्या.
  • संजय राऊत यांनी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी ५८ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप केला होता.
  • किरीट सोमय्यांचा अजित पवारांवरही निशाणा.

Kirit Somaiya On Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ५८ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप केला होता. दरम्यान आता या आरोपाला सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी ५८ कोटी रुपयांचा घोटाळा केला असा घोषित केला आहे पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या बाबतचा एकही कागदी पुरावा संजय राऊत देऊ शकले नाही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे परंतु त्याची अजून एकही प्रत माझ्याकडे आली नाही तसेच मी एक दमडीचा देखील घोटाळा केला नाही. असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. (Sanjay Raut only makes allegations but could not give evidence says Kirit Somaiya). 

अधिक वाचा : अजानसाठी लाउडस्पीकर वापरण्यावर अनुराधा पौडवालांचे सवाल

दरम्यान, माझे देखील उद्धव ठाकरेंना खुले आव्हान आहे ५८ कोटी गोळा केले तसे बॉक्सेस वापरले कुठल्या चार बिल्डरकडे मनी लॉन्ड्रिंग केले हे स्वतः संजय राऊत यांनी काल सांगितले आहे. ही माहिती त्यांनी जनतेसमोर ठेवावी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत कुठल्याही चौकशीला घाबरत नाही ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढतच राहणार असे सोमय्या यांनी आणखी सांगितले. 

अजित पवारांवर केला आरोप 

मी आज ईडी कार्यालयात जरंडेश्वर साखर कारखान्याच्या घोटाळ्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना भेट देऊन चर्चा करणार आहे. जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीने अजित पवार यांनी ताब्यात घेतला आहे तो त्यांना परत करावा असे किरीट सोमय्या म्हणाले. 

संजय राऊत काय म्हणाले 

माजी सैनिक बबन भोसले यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय दंड विधान ४२०,४०६ आणि ४३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा केले आणि पीएमसी बँकेतून हा पैसा पांढरा केला असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाने ७११ मोठ्या बॉक्समधून पैसे गोळा केले. हे सर्व बॉक्स सोमय्या यांच्या नीलमनगर कार्यालयात आणले गेले. या पैश्यांचे बंडल बांधण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तिथे बोलवण्यात आले होते. हे पैसे पीएमसी बँकेत वळवण्यात आले. आणि हे पैसे व्हाईट करून नील सोमय्याच्या व्यवसायात आणि किरीट सोमय्या यांच्या निवडणुकीत वापरण्यात आले. महाराष्ट्रातून ५८ कोटी रुपये जमा झाले होते. परंतु हा घोटाळा आणखी मोठा आहे असे राऊत म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी