Patra Chawl Scam: काय आहे एक हजार कोटी रुपयांचा पत्रा चाळ घोटाळा ? संजय राऊतांचा काय आहे संबंध ?

Patra Chawl Scam: पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशीनंतर अखेर शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना अखेर अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांना अटक करण्यापूर्वी त्यांच्या घरातून साडे अकरा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राऊत यांनी या पैश्यांचा हिशोब दिलेला नाही. तसेच राऊत यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. यातील खुपसारी कागदपत्रं ही पत्रा चाळ संबंधित आहेत.

sanjay raut
संजय राऊत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशीनंतर अखेर शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
  • संजय राऊत यांना अटक करण्यापूर्वी त्यांच्या घरातून साडे अकरा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
  • राऊत यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

Patra Chawl Scam :मुंबई : पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी (patra chawl scam) चौकशीनंतर अखेर शिवसेना खासदार (shivsena mp) आणि सामनाचे (Daily Saamana) कार्यकारी  संपादक (Excutive Editor) संजय राऊत (Sanjay Raut)) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांना अटक करण्यापूर्वी त्यांच्या घरातून साडे अकरा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राऊत यांनी या पैश्यांचा हिशोब दिलेला नाही. तसेच राऊत यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. यातील खुपसारी कागदपत्रं ही पत्रा चाळ संबंधित आहेत. फक्त राऊतच नाही तर त्यांच्य पत्नीलाही घोटाळ्यासंबंधित चौकशीसाठी बोलावले आहे. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी संजय राऊत हे ईडीसमोर १ जुलै रोजी हजर झाले होते. त्यानंतर ईडीने त्यांना दोनवेळा हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु संसदेत सत्र सुरू असल्याने ते अनुपस्थित राहिले. (sanjay raut patra chawl scam explained in marathi )

अधिक वाचा : संजय राऊत अटकेत, ईडीची कारवाई

काय आहे पत्रा चाळ घोटाळा?

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. २००७ साली पत्रा चाळ जमीन घोटाळ्याची सुरूवात झाली. प्रवीण राऊत, गुरूष आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी म्हाडासोबत हा जमीन घोटाळा केला आहे. म्हाडाने पत्रा चाळीच्या पुर्नविकासाचे कंत्राट गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे दिले होते. यात १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असे सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांचे मित्र प्रवीण राऊत हे या प्रकरणी आरोपी आहेत. या कन्सट्रक्शन कंपनीने चाळीच्या लोकांना धोका दिल्याचा आरोप केला जात आहे. गुरू कन्स्ट्रक्शन कंपनी प्रवीण राऊत यांची असून पत्रा चाळीत ३ हजार फ्लॅट बनवण्याचे कंत्राट त्यांच्या कंपनीला मिळाले होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट हे चाळीच्या रहिवाशांना मिळणार होते. परंतु पत्रा चाळीची जमीन एका खासगी बिल्डरला विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

अधिक वाचा : 'ईडी मला अटक करणार आणि मी अटक करुन घेणार' ED ने ताब्यात घेताच Sanjay Raut यांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्यावर आरोप

गुरू आशिष कंपनीवर आरोप आहे की त्यांनी पत्रा चाळीचे पुर्नविकास करण्याऐवजी ही ४७ एकर जमीन वेगवेगळ्या बिल्डरांना विकून टाकली. या व्यवहारातून कंपनीला १ हजार ३४ कोटी रुपये मिळाले. गुरू आशिष कंपनीचे मालक प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपयांचे कर्ज दिले होते असे ईडीच्या तपासात समोर आले आहे. याच पैश्यांतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये एक फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट इडीने सध्या सील केला आहे. वर्षा राऊत आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या पत्नीने अलिबागमध्ये एक प्लॉट विकत घेतला आहे. या प्लॉटच्या व्यवहरातही पैश्यांचा गैरव्यवहार झाल्याचे इडीने म्हटले आहे. 

अधिक वाचा :  ....म्हणून संजय राऊतांवर ईडीची कारवाई, काँग्रेसने उपस्थित केली भलतीच शंका


मुंबई पोलिसांत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

तर दुसरीकडे स्वप्ना पाटकर या महिलेच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वप्ना पाटकर या पत्रा चाळ घोटाळ्यातील एक महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी आहेत. १५ जुलै रोजी स्वप्ना पाटकर यांना एक धमकी देणारे एक पत्र मिळाले होते. या चिठ्ठीत पाटकर यांना बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच ईडीपुढे काहीच न बोलण्याची धमकीही देण्यात आली होती. संजय राऊत यांनीच ही चिठ्ठी लिहिल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे. पाटकर यांनी या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली होती. पाटकर यांच्य तक्रावरीवरून राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अधिक वाचा : Sanjay Raut: 9 तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी