Sanjay Raut  | कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही - संजय राऊत

एखाद्या पक्षाने अल्टीमेटम दिला म्हणून त्यानुसार राज्य चालत नाही. या ठिकाणी कायद्याचे राज्य आहे.  कुणाच्या धमक्यांवर शांती बिघडत नाही असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या अल्टीमेटमवर प्रतिक्रिया दिली आहे. 

Sanjay Raut Reaction on MNS Chief Raj Thackeray Ultimatum on Majid spiker
कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही - संजय राऊत 
थोडं पण कामाचं
  • एखाद्या पक्षाने अल्टीमेटम दिला म्हणून त्यानुसार राज्य चालत नाही.
  • या ठिकाणी कायद्याचे राज्य आहे.
  • कुणाच्या धमक्यांवर शांती बिघडत नाही असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या अल्टीमेटमवर प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई :  एखाद्या पक्षाने अल्टीमेटम दिला म्हणून त्यानुसार राज्य चालत नाही. या ठिकाणी कायद्याचे राज्य आहे.  कुणाच्या धमक्यांवर शांती बिघडत नाही असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या अल्टीमेटमवर प्रतिक्रिया दिली आहे. 

अधिक वाचा : ​राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट; अटक होणार?

दररोज सकाळी ते पत्रकारांशी संवाद साधत असतात. त्यानुसार आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कुणी सभेतून काही बोललं म्हणजे काही होत नाही, आज शुभ दिवस आहे,  धमक्या देणा-यांत ती ताकद नाही.  त्यांच्यामागे ज्या शक्ती आहेत त्यांच्या त्यांचा बंदोबस्त करायला हवा असे भाजपचे नाव न घेता राऊत यांनी टोला लगावला. 

अधिक वाचा : या ५ दिग्गज खेळाडूंनी स्पोर्ट्स अँकरशी केले लग्न

ते सत्तेत येऊ शकत नाहीयत, त्यामुळे हे सारे धंदे सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निर्णय घेतला जाईल.  राज्याचे गृहमंत्री, शरद पवार, मुख्यमंत्री सारे अनुभवी आहेत, इथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सहज निर्माण होऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले 

अधिक वाचा : सिक्स पॅक ॲब्स बनवण्यासाठी डंबेलच्या मदतीने करा हे ५ व्यायाम

कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य  चालत नाही, कुणाच्या धमक्यांवर शांती बिघडत नाही. कुणी सभेतून काही बोललं म्हणजे काही होत नाही,  आज शुभ दिवस आहे, अक्षय तृतिया आहे. असेही राऊत म्हणाले. 

 बेळगावचा मुद्दा संपलेला नाही, ती जमीन तुमची नाही, जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत काहीही होणार नाही, असेही बेळगाव प्रश्नी राऊत यांनी मत व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी