Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut receive threat message: उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आला आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून देण्यात आल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी संजय राऊतांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. धमकी प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
हे पण वाचा : बाळाला या भांड्यात जेवण भरवल्यास मिळतील असंख्य फायदे
खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. राऊतांना शुक्रवारी रात्री मोबाइलवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये धमकी देत म्हटलं, दिल्लीत आल्यावर AK 47 रायफलने गोळ्या झाडून मारुन टाकू.
Mumbai: I got a threat message and I have informed the police. I won't be scared. Similar attempts were made to carry an attack on me but what did the police do, what did the state's home minister do?: Sanjay Raut pic.twitter.com/BXRDFX7oKW — ANI (@ANI) April 1, 2023
सलमान आणि तुम्ही आमच्या टार्गेटवर असून पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणे अवस्था करू अशी धमकी संजय राऊतांना देण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. या प्रकरणी संजय राऊतांनी तक्रार दाखल केली आहे.
हे पण वाचा : दररोजच्या या सवयींमुळे गळतात केस
खासदार संजय राऊत म्हणाले, खासदार आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसांना कळवावं म्हणून मी रात्रीच पोलिसांना सांगितलं आहे. कळवून सरकारला काही फायदा नाही. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. हे विरोधकांना एकतर तुरुंगात टाकण्यासाठी तयार आहेत किंवा मारण्यापर्यंत त्यांची मजल जावू शकते असं मला वाटतं. असं पहिल्यांदाच झालेलं नाहीये. हे सरकार आल्यावर आमची सुरक्षा काढण्यात आली. पण मी कोणालाही तक्रार केली नाही. पण वारंवार मुख्यमंत्र्यांचा मुलगा हा गुंडासोबत मिळून षडयंत्र रचतो, माझ्यावर हल्ला केला जातो या संदर्भात मी गृहमंत्र्यांना माहिती देतो तर म्हणतात हा स्टंट आहे. मग तुमच्या घरात जे होतं तो स्टंट नाही का? तुम्ही त्यासाठी एसआयटी स्थापन करता, लोकांना पकडून आणता. तो तर सर्वात मोठा स्टंट आहे. सत्य आम्हाला माहिती आहे पण आम्ही मर्यादा राखतो. जर मी सत्य बोललो तर भूकंप होईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.