Sanjay Raut Tweet: जेव्हा संजय राऊत ट्विटरवर होतात भावूक!

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 17, 2022 | 11:50 IST

Sanjay Raut Tweet on Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना नेते संजय राऊतांनी बाळासाहेबांचे काही जुने फोटो शेअर करत भावूक ट्विटही केलं आहे. पाहा राऊत नेमकं काय म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • बाळासाहेब ठाकरेंचा दहावा स्मृतीदिन
  • संजय राऊतांनी शेअर केले बाळासाहेबांसोबतचे जुने फोटो
  • संजय राऊत ट्विटरवर झाले भावूक

Balasaheb Thackerays Memorial Day: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज (17 नोव्हेंबर) 10वा स्मृतीदिन. याचनिमित्ताने त्यांना जगभरातून अभिवादन केलं जात आहे. मात्र, त्यांच्या एका खास शिलेदारानं केलेलं अभिवादन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बाळासाहेबांचा तो शिलेदार म्हणजे संजय राऊत. (sanjay raut shared an emotional tweet on balasaheb thackerays memorial day)

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या कठीण काळातही संजय राऊत हे कायम आपला पक्ष आणि नेत्यासोबत राहिले. अगदी त्यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळही आली, पण तरीही त्यांचा निश्चय ढळला नाही. त्यामुळेच संजय राऊत हे कडवट शिवसैनिक असल्याचं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

अधिक वाचा: Sanjay Raut: 'हातातले खंजीर बाजूला ठेवा अन्...', राऊतांची CM शिंदेवर बोचरी टीका

याच कडवट शिवसैनिकाने बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतीदिनी खास अभिवादन केलं आहे. संजय राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना खास श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संजय राऊत यांनी बाळासाहेबांना अभिवादन करताना ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, 'साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी!' 

या ट्विटनंतर संजय राऊतांनी आणखी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये राऊतांनी त्यांचा बाळासाहेबांसोबत एक जुना फोटो ट्विट केला आहे. ज्या फोटोमध्ये बाळासाहेबांसोबत तरुण संजय राऊत पाहायला मिळत आहेत.

अधिक वाचा: बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ गोमूत्रानं शुद्ध करत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदेंचा निषेध

या ट्विटसोबत कॅप्शनमध्ये असंही म्हटलं आहे की, 'हे नाते खूप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है… साहेब… विनम्र अभिवादन! जय महाराष्ट्र!'

बाळासाहेबांचा शिलेदार ते उद्धव ठाकरेंचा पाठीराखा

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची संपूर्ण धुरा ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर आलेली. त्यातच 2014 साली अचानक भाजपने राज्यात युती तोडून शिवसेनेला अक्षरश: एकाकी पाडलेलं. अशा पडत्या काळातही संजय राऊत हे कायम उद्धव ठाकरेंसोबतच होते.

तर 2019 विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या संपूर्ण राजकारणात संजय राऊत हे केंद्रस्थानी होते. शरद पवारांच्या साथीने राजकारणाचे अगम्य असे डाव टाकून राज्यात अतिशय नाट्यमयरित्या महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात राऊतांचा सिंहाचा वाटा होता. 

त्यावेळी संजय राऊत हे शिवसेनेचे खऱ्या अर्थाने हिरो ठरलेले. मात्र, बरोबर अडीच वर्षानंतर हेच संजय राऊत शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसाठी व्हिलन ठरले. ज्यांच्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, अनेकांना मंत्रिपदं मिळाली त्याच राऊतांना शिवसेनेच्या जवळजवळ सर्वच आमदारांनी शिव्याशाप दिले.

40 हून अधिक आमदार आणि 13 खासदार हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले मात्र, तरीही संजय राऊतांनी आपल्या नेत्याला कधीही एकटं सोडलं नाही. या सगळ्यामुळेच संजय राऊत हे खऱ्या अर्थाने कट्टर शिवसैनिक असल्याचं नेहमीच म्हटलं जातं.

राऊतांची बाळासाहेबांवर असणारी अढळ श्रद्धा आणि शिवसेनेप्रतीची निष्ठा त्यांना आज एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेलीय एवढं मात्र नक्की...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी