Sanjay Raut On Raj Thackeray : भाजपने आपल्या मळमळीचा भोंगा दुसऱ्यांच्या तोंडून वाजवला - संजय राऊत

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 03, 2022 | 17:44 IST

भारतीय जनता पार्टीचा लाऊडस्पीकर काल शिवाजीपर्कात वाजत होता, स्क्रिप्ट त्यांची होती, टाळ्या त्यांच्या होत्या आणि घोषणा देखील त्यांच्या होत्या, आता आम्हाला थोडासा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल की अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Sanjay Raut
राज ठाकरेंच्या सभेतील भोंगा भाजपचा अन् टाळ्याही स्पॉन्सर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
  • भारतीय जनता पक्षाने त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढली, हे आता स्पष्ट दिसते -संजय राऊत

मुंबई  :  भारतीय जनता पार्टीचा लाऊडस्पीकर काल शिवाजीपार्कात वाजत होता, स्क्रिप्ट त्यांची होती, टाळ्या त्यांच्या होत्या आणि घोषणा देखील त्यांच्या होत्या, आता आम्हाला थोडासा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल की अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

भारतीय जनता पार्टी आणि आमच्यात काय झाले ते आम्ही बघून घेऊ, तिसऱ्याची आम्हाला जरुरत नाही, आमच्यात जे काही झालं ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही यात पडायची गरज नाही, असा सल्लाही त्यांनी आज राज ठाकरेंना दिला आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पाडव्याच्या मेळाव्यात जबरदस्त भाषण केलं. या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक याचा समाचार घेतला. शिवाय मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या राजकारणाचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. परंतु राज ठाकरेंनी या भाषणात भाजप विरोधात आणि महागाईविषयी काही बोलले नाहीत, हीच गोष्ट राष्ट्रवादी, शिवसेनेला खटकली आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपने आपल्या मळमळीचा भोंगा दुसऱ्यांच्या तोंडून वाजवला.  आपण याकडे लक्ष दिले नाही पाहिजे, काल मराठी भाषा भवनाचे उद्घाटन झाले, मेट्रोचे उद्घाटन झाले म्हणजे मुख्यमंत्री काम करत आहेत नेतृत्व करत आहेत. त्याच्यावर बोला, तुमच्या भोंग्याचे काय करायचे, यांच्या भोंग्याचे काय करायचे, त्यासाठी सरकार समर्थ आहे.

शरद पवारांनी जातीवाद बसवला, त्यात शरद पवारांच्या चरणात आपण देखील जात होतात, सल्लामसलत करण्यासाठी, कशा करता आपण टोलेजंग माणसांवर बोलायचं? एवढ्या मोठ्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्यादेखील स्पॉन्सर्ड आहेत, काल शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता, महाराष्ट्राला एकच कळलं की अक्कलदाढ उशिरा येते. देशात असे अनेक वेळा होते, शेवटी बहुमत तयार होते, त्याचवेळी सरकार बनते, युतीचे बहुमत झाले नाही महाविकास आघाडीचे बहुमत झालं, आम्ही खोटे बोलणार यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनले आहे, काल त्यांनी मराठी भाषा भवनाचे स्वागत करायला हवे होते, त्याविषयी काही बोलले नाहीत, कोणी फक्त टीका करायची, याने आहे तेसुद्धा गमावून बसाल, अशी टीका संजय राऊत केली आहे.

भारतीय जनता पक्षाने त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढली, हे आता स्पष्ट दिसते आहे, आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे, राज्यांवर जी संकट येत आहेत त्यांच्याशी लढा द्यायचा आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या घुसखोरी आणि अतिक्रमणाच्या विरोधात लढा द्यायचा आहे आणि हे करत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकवायचा आहे.अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, बीजेपी शासित किती राज्यांमध्ये अजान बंद केली आहे? मशिदींच्या वरून भोंगे काढून टाकले आहेत, जे कायद्यात बसते, त्यानुसार गृहमंत्री काम करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी