मुंबई : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला जे पक्ष विरोध करीत आहेत ते शेतकऱ्यांचे शूत्र असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यासंदर्भात कोण काय करतात ते मला माहित नाही ..वाइन हे शेतकरी पिकवत असलेल्या फळापासून बनणारे उत्पादन आहे ..मद्याचा दर्जा आहे का हे मला माहीत नाही जर असेल तर देशामध्ये दारू बंदी आहे का? मी कोणाला समर्थन करत नाही ? मात्र सरकारने वाईन विक्रीला सवलत दिली आहे, सुपर मार्केट असेल त्याला राजकीय पक्ष विरोध करत आहे. ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
वाईनच्या माध्यमातून एक्सपोर्ट वाढले तर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उपत्न मिळेल म्हणजेच द्राक्ष, चिकू, पेरू, शॉप, असे अनेक धान्य उत्पादनातून वाइन बनवली जाते आणि त्यातून शेतकऱ्यांचा उत्पन्नात देखील वाढत आहे ते लक्षात घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू शकतो यातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. शेतकऱ्यांच्या हिताचे संबंध आहे, राजकीय पक्ष आता टीकाटिपणी करत आहे त्यांनी थोडंसं शेतकऱ्यांचा आर्थिक गणित समजून घ्यावं. नाहीतर हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही ?आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात उभे आहात.. आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेले अशी एक म्हण आहे महाराष्ट्राला संस्कृती आहे संस्कार आहेत आणि महाराष्ट्राने काय व्हावं काय घडावं याचा निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात माननीय शरद पवार समर्थ आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत आणि ते धाडसाने घ्यावे लागतात, असेही राऊत म्हणाले
डेंजर टू डेमोक्रसी
डेंजर टू डेमोक्रसी सध्या देशामध्ये एक विषय सुरू आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतून बेशिस्त वर्तन करणाऱ्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलेला आहे. लोकशाही वाचविण्यासाठी हे निलंबन करण्यात आलेलं आहे. राज्यपालांनी बारा विधानसभा सदस्यांच्या फायली राजकीय दबावाखाली दाबून ठेवलेल्या आहे. त्याला डेंजर टू डेमॉक्रसी म्हणावं लागेल परंतु याच्यावर कुठलंही न्यायालय ठामपणे आदेश द्यायला तयार नाही .पण विधानसभेच्या हक्कांवर ती जर एखादा न्यायालय बोलत असेल तर ते डेंजर टू डेमोक्रसी असेल, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.
नाना पटोलेंना हे माहिती आहे....
हे सगळे निर्णय दिल्लीत घेतले जातात नाना पटोले राज्याचे अध्यक्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय वेगळा असतो विधानसभा लोकसभा संदर्भात निर्णय कुठले घ्यायचे आहे यासंदर्भात आम्ही केंद्रीय नेतृत्वाशी नक्कीच चर्चा करू आणि आमचा त्यांच्याशी संपर्क देखील आहेत नानांना हे माहिती देखील आहे
उत्पल पर्रीकरांच्या माध्यमातून देशाचे घाणेरडे राजकारण समोर
उत्पल पर्रीकर यांच्याकडे पणजी पुरतं पाहू नका उत्पल पर्रीकर हे देशातल्या राजकारणामध्ये जो घाणेरडे प्रवाह चालू झाला आहे भ्रष्टाचारी व्यभिचारी यांना तिकिट द्यायचं त्याच्याविरुद्ध उत्पल पर्रीकर आहेत देशाचं राजकारण स्वच्छ करण्यासाठी मोदी आले होते परंतु त्यांच्याच पक्षाने गोव्यामध्ये ज्या लोकांना तिकीट दिलं. खरतर त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी मोदीजींचा पराभव केला आहे
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.