तुरुंगातून बाहेर येताच राऊतांची 'जुबा बोले मैत्री'?, दिल्लीत पंतप्रधान, शहांची तर मुंबईत फडणवीसांची घेणार भेट

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 10, 2022 | 12:06 IST

काल बुधवारी संजय राऊत आर्थर रोड जेलच्या बाहेर आल्यानंतर शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. विरोधकांना धडकी भरावी असं भाषणही कार्यकर्त्यासमोर दिलं. संजय राऊत आता भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार येत्या काही दिवसात घेणार असं वाटलं होतं. परंतु आज दुसऱ्या दिवशी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवरील राग कमी केला काय असं वाटू लागलं आहे.

Sanjay Raut will meet Fadnavis directly, know why
संजय राऊत थेट घेणार फडणवीसांची भेट, जाणून घ्या कारण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • माझ्यावर काय अन्याय झाला याची तक्रारच मोदी आणि शहांकडे करणार
  • राज्याचे उपमुख्यमंत्री सरकार चालवत आहेत- संजय राऊत
  • लोकांची काही कामे आहेत. माझा भाऊ आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघातीलही कामे असल्याने संजय राऊत फडणवीसांची भेट घेणार

मुंबई : ठाकरे गटातील (Thackeray group) खासदार (MP)  संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रा चाळ (Patra Chaal) प्रकरणात 103 दिवस तुरुंगात राहवे लागले.  स्पेशल पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांची अटक  बेकायदेशीर होती असं म्हणत काल बुधवारी जामीन मंजूर केला.  ईडी (ED)लक्ष्य करुन व्यक्तींना खोट्या प्रकरणात अडकत असल्याचं म्हणत न्यायालयाने ईडीला फैलावर घेतलं. दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकारासोबत संवाद साधला. तुरुंगातून बाहेर येताच 103 ची डरकाळी फोडणारे संजय राऊत आज मैत्रीची आणि कटूता मिटवण्याचा भाषा करू लागले आहेत.  (Sanjay Raut will meet Prime Minister  and Fadnavis)

अधिक वाचा  :  Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार

काल बुधवारी संजय राऊत आर्थर रोड जेलच्या बाहेर आल्यानंतर शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. विरोधकांना धडकी भरावी असं भाषणही कार्यकर्त्यासमोर दिलं. संजय राऊत आता भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार येत्या काही दिवसात घेणार असं वाटलं होतं. परंतु आज दुसऱ्या दिवशी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवरील राग कमी केला काय असं वाटू लागलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सरकार चालवत आहेत, त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. त्याची लवकरच भेट घेणार असं  राऊत म्हणाले.

अधिक वाचा  :India-England semi-final Match: कशी आहे मैदानाची स्थिती

इतकेच नाहीतर संजय राऊत हे दिल्ली जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहेत.  कालची त्यांनी भरलेली डरकाळी आणि आज भेट घेण्याची भाषा यामुळे अनेकजण चक्रावले आहेत. तुरुंगातील यातना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुरुंगात राहणं फारच कठिण असतं. असं म्हणत आपण लवकरच  पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची राऊत म्हणाले. तर दुसऱ्या बाजुला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. 

भेटीचं काय आहे कारण

काल संजय राऊत यांनी डरकाळी फोडत विरोधकांचा घाम फोडला परंतु आज त्यांनी भेटीची भाषा केल्यानं अनेकजण चक्रावले आहेत. परंतु आपण पंतप्रधान, अमित शहा यांची भेट का घेणार याचं कारणही त्यांनी माध्यमांना सांगितले आहे, माझ्यावर काय अन्याय झाला याची तक्रारच मोदी आणि शहांकडे करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

फडणवीसांना का भेटणार 

संजय राऊत तब्बल तीन महिन्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करतानाच त्यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. हे माझं निरीक्षण आहे. राज्याचं नेतृत्व फडणवीसच करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारणात असलेल्या कडूपणा मिटावा, असं म्हटलं त्याचं मी स्वागत करतोय.  

कडूपणा मिटावा, असं आपलं मत असल्याचं राऊत म्हणालेत. तसेच फडणवीस हे अनुभवी नेते आहेत. महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडूनच ऐकत आहे. त्यांच्या खात्याशी निगडीत काम आहे. त्यामुळे मी त्यांना भेटणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.  लोकांची काही कामे आहेत. माझा भाऊ आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघातीलही कामे आहेत. त्यामुळे मी फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं राऊत म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी