Sanjay Raut : आज उच्च न्यायालयात संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 11, 2022 | 07:14 IST

तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईवर न्यायालयाने संशय व्यक्त केला आहे.  

 Sanjay Raut's bail petition to be hearing in High Court today
संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
  • संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीला झापले.
  • संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली.

मुंबई : साधरण 103 दिवसांनंतर तुरुंगातून संजय राऊत (Sanjay Raut) बाहेर आले आहेत. परंतु संजय राऊत यांचा जामीन (Bail) रद्द करण्यात यावा, अशी याचिका (Petition)ईडीकडून करण्यात आली आहे. त्यावर आज उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी (Hearing) होणार आहे. गुरुवारी वेळ मिळाला नसल्याने ही सुनावणी होऊ शकली नव्हती.  दरम्यान पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे पीएमएलए कोर्टाने म्हटलं आहे. तसेच ईडीच्या (ED) तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत. (Sanjay Raut's bail petition to be heard in High Court today)

अधिक वाचा  :  भारतीय कर्मचाऱ्याची रुजू झाल्यावर 2 दिवसात मेटातून हकालपट्टी
तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईवर न्यायालयाने संशय व्यक्त केला आहे.  ईडीच्या म्हणण्यानुसार निकाल दिला तर नागरिकांचा न्यायपालिकेवरील विश्वास उडेल असं विशेष न्यायालयाने म्हटलं होतं.  त्यामुळे आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

अधिक वाचा  : शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भररस्त्यात चाकूने वार

न्यायालयाने ईडीला झापलं 

संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीला झापले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक कऱण्याऐवजी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली. असं म्हणत न्यायालयाने ईडीच्या कामावर ताशेरे ओढले.  

 संजय राऊत तुरुंगाबाहेर येताच फटाक्यांची आतिषबाजी

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना बुधवारी कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. 100 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर आले. संजय राऊत यांना जामीन मिळताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी आले होते. शिवसैनिकांच्या गराड्यातच त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी