Savitribai Phule Birth Anniversary : सावित्रीबाई फुलेंमुळेच मुलींची झाली चूल अन् मूलपासून मुक्ती, शिक्षणाची उघडली दारे

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 03, 2022 | 07:30 IST

India's first female teacher Savitribai Phule : आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली धडक मारली आहे. एक काळ असा होता की महिलांना फक्त घरातील चूल आणि मूल संभाळावी लागत होती. परंतु सावित्रीबाई फुले (Savitribai Phule ) यांनी दिलेल्या महिला (Women) शिक्षणाच्या (Education) धड्यामुळे आजची स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती,तर कुठल्या कंपनीत सीईओ पदावर पोहचल्या आहेत.  

Savitribai Phule
सावित्रीबाई फुलेंमुळेच झाली मुलींची चूल अन् मूलपासून मुक्ती  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले.
  • भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचा मान सावित्रीबाई फुले यांना आहे.
  • सावित्रीबाई फुले यांनी समाजातील जातीयवाद आणि अन्यायी रुढी परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवला.

Savitribai Phule Birth Anniversary: मुंबई  : आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली धडक मारली आहे. एक काळ असा होता की महिलांना फक्त घरातील चूल आणि मूल संभाळावी लागत होती. परंतु सावित्रीबाई फुले (Savitribai Phule ) यांनी दिलेल्या महिला (Women) शिक्षणाच्या (Education) धड्यामुळे आजची स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती,तर कुठल्या कंपनीत सीईओ पदावर पोहचल्या आहेत.  भारतातील पहिल्या महिला शिक्षिका (teacher) आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. 

आज म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता. सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी झटत होत्या. महिलांना शिक्षण मिळवून देणं, रुढी परंपरांपासून महिलांना मुक्त करण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. यामुळे आजच्या दिवसा महिला मुक्तिदिन म्हटलं जातं. 
भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचे काम केले. त्या काळात मुलीचे शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली. 

सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांच्या मदतीने पुण्यात पहिल्या मुलीच्या शाळेला सुरुवात केली. त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेचे काम केले. त्या अर्थी त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील जातीयवाद आणि अन्यायी रुढी परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. अत्याचार, बालविवाह यांच्याविरोधात भूमिका घेतली आणि समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि समाजातून बहिष्कृत व्हावं लागलं. पण त्याला न जुमानता त्यांनी 1848 साली पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या या शाळेत केवळ नऊ मुली होत्या.  इतकंच काय त्यांनी विधवा स्रियांचे मुंडण करण्याच्चा प्रथेवरही त्यांनी आपला आसूड उगारला. 1873 साली ज्योतिबांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. 

1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला होता. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना त्या स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी