Coastal Road project Scam : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा, शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 07, 2021 | 15:31 IST

Scam in Coastal Road project Ashish Shelar Allegations: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडमुळे (Coastal Road) सरकार (Government)अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Scam in CM's Dream Project Coastal Road project
कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा, शेलारांचा गंभीर आरोप  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कोस्टल रोडचा डीपीआर हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा
  • प्रकल्प सल्लागार असलेल्या एजन्सींना बेकायदेशीरपणे आर्थिक मदत केली जात आहे. - शेलारांचा आरोप
  • 32 महिने झाले तरी प्रिव्हेन्शन प्लान झालेला नाही.

Scam in Coastal Road project Ashish Shelar Allegations: मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडमुळे (Coastal Road) सरकार (Government) अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कोस्टल रोडमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. सल्लागाराला नियमबाह्य पद्धतीने अधिक रक्कम देण्यात आली असून कॅग (CAG) नेही त्यावर ताशेरे ओढले आहेत, असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी केला आहे. शेलार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेऊन हा दावा केला आहे. या परिषदेत त्यांनी मुंबई महापालिकेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबई महानगर पालिका ठरवून बनावाबनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत चाललं काय? असा सवाल करतानाच महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा आरोप शेलार यांनी केला. 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचे मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र आजही या प्रकल्पात अनागोंदी आणि अफरातफरी चालू आहे, असे त्यांनी सांगितले.

आशिष शेलार यांनी म्हटले की, प्रकल्प सल्लागार असलेल्या एजन्सींना बेकायदेशीरपणे आर्थिक मदत केली जात आहे. मुंबई महापालिकेचा पैसा त्यांच्या घशात जात आहे.  त्यांना अवास्तव आणि अनाकलनीय बिलाचे पैसे दिले जात असल्याचे शेलार यांनी म्हटले. 

कोस्टलचा डीपीआर चुकीचा

कॅगने कोस्टल रोडवर काय ताशेरे ओढले त्यावरही शेलार यांनी भाष्य केलं. कोस्टल रोडचा डीपीआर हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा असल्याचं कॅगने म्हटले आहे. डीपीआर करताना जे ट्रॅफिकचं अचूक विश्लेषण केले जाते. यात वाहतुकीचे अॅनालिसिस केले गेले नाही, असे कॅगने म्हटले आहे, असे त्यांनी सांगितलं.

पालिकेचा प्रिव्हेन्शन प्लानच नाही, मग पालिकेचा छुपा अजेंडा आहे का?

कॅगने पर्यावरण संबंधाच्या मुद्द्यावरूनही ताशेरे ओढले आहेत. या प्रकल्पात पर्यावरणाबाबतची सजगता पाळली नसल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. समुद्रात नव्याने जागा निर्माण होईल. ती महागडी असेल. त्यावर बेकायदा फेरिवाले, अनधिकृत धार्मिकस्थळे आणि बांधकामे येणार नाही. त्याबाबतचा प्रिव्हेन्शन प्लान करा असे केंद्राने सांगितले होते. पण 32 महिने झाले तरी प्रिव्हेन्शन प्लान झालेला नाही. याचा अर्थ पालिका हमीपत्रं द्यायला तयार नाही. कारण काय? यामागचा पालिकेचा छुपा अजेंडा काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

रोड सोडून मिळालेल्या जागेचं लँड स्केपिंग करण्याच्या सूचना केंद्राने केल्या होत्या. त्यासाठी निधीची तरतूद करण्यास सांगितलं होते. पण 29 महिने झाले तरी महापालिकेने हा प्लान दिला नाही.  त्याशिवाय या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोळी व इतरांच्या पुनर्वसनाचा मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याची सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली होती. मात्र, मुंबई महापालिकेने अद्यापही पुनर्वसन केले नसल्याचा आरोप शेलार यांनी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी