Maharashtra School Reopen : मुंबई : राज्यभरात (Maharashtra State) आजपासून बालवाडी (Kindergarten) ते इयत्ता बारावी (Class XII) पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या (Corona) दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये काहीशी धाकधूक आहे. याच चिंतेमुळे काही जिल्ह्यात शाळा आजपासून सुरू केली जाणार नाही. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शाळा सुरू करण्याच्या संदर्भात एसओपी (मार्गदर्शक सूचना) दिल्या आहेत त्याचे पालन करुनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सर्व निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्याचे पालन करुनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही काही आवश्यक सुचना पालकांना आणि शाळांना दिल्या आहेत. दरम्यान, राज्यातील शाळा आज सोमवारपासून सुरू होणार आहेत.
कोरोना महामारीच्या काळात तब्बल 700 दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. मात्र, अनेक जिल्हा प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.
पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. तर, नागपुरात 26 जानेवारीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये मात्र सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. नाशिकमधील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. तर शाळेत विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास पुन्हा शाळा बंद करण्यात येईल. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. नववी वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग होणार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त इयत्ता नववी ते 12 च्या 420 शाळा सुरू होणार आहेत. नववी ते 12 च्या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहून पहिल्या आठवड्यानंतर उर्वरित शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभाग घेणार आहे. शाळेचे कामकाज फक्त तीन तास चालणार असून प्रत्येक शाळेत वैद्यकीय कक्ष बंधनकारक करण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यात सोमवारपासून शहरी भागातील आठवी ते 12 वीपर्यंत तर ग्रामीण भागातील पहिली ते 12 वी पर्यतचे वर्ग उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शाळा 24 जानेवारीपासून पहिली ते 12वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत.
या जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्याने वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुग राजन एस यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत. तर औरंगाबाद, बीड, नांदेडमध्ये फक्त दहावी, बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत.
शाळा सुरू करत असताना संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन आणि काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास संमती देतील असे विद्यार्थी शाळेत येतील. शिक्षण कुणाचेही थांबू नये, असा आमचा प्रयत्न आहे असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होतं.
राज्यात आजपासून शाळा सुरु होत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सर्व पालकांना मुलांना शाळेत पाठवण्याची विनंती केली आहे. जगभरातील शाळांचा अभ्यास केल्यानंतरच सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.