Mumbai School Reopen : मुंबईत कडक नियमांचे पालन करत सुरू होणार शाळा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 21, 2022 | 23:31 IST

Schools will start in Mumbai following strict rules : कोरोना स्थिती नियंत्रणात असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा, ज्युनिअर कॉलेज सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहेत.

Schools will start in Mumbai following strict rules
मुंबईत कडक नियमांचे पालन करत सुरू होणार शाळा 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत कडक नियमांचे पालन करत सुरू होणार शाळा
  • सोमवार २४ जानेवारीपासून सुरू होणार शाळा
  • कोविड प्रोटोकॉल आणि मनपाने लागू केलेल्या इतर सर्व नियमांचे पालन करण्याचे बंधन

Schools will start in Mumbai following strict rules : मुंबई : कोरोना स्थिती नियंत्रणात असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा, ज्युनिअर कॉलेज सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहेत. कोविड प्रोटोकॉल आणि मुंबई महापालिकेच्या कडक नियमांचे पालन करुन शाळा सुरू होणार आहेत.

  1. शाळेत स्वच्छता राखण्याचे बंधन. शाळेत ठिकठिकाणी हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था ठेवण्याचे बंधन.
  2. ज्या शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना शाळेत प्रवेश मिळेल.
  3. आजारी असलेल्या तसेच सर्दी-खोकला-ताप-अंगदुखी-डोकेदुखी यापैकी कोणताही त्रास होत असलेल्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. 
  4. पालकांच्या परवानगीने मुलं शाळेत जाऊ शकतील. 
  5. शाळेत खेळाचा तास होणार नाही.
  6. शाळेत प्रवेश केल्यापासून ते शाळेतून बाहेर पडेपर्यंत मुलांना सर्वत्र सोशल डिस्टंस राखण्याचे बंधन आहे. प्रार्थनेच्या निमित्ताने अथवा डबा खाण्याच्या निमित्ताने मुलांना सोशल डिस्टंसच्या नियमाचे उल्लंघन करण्यास मनाई आहे.
  7. १५ ते १८ वयोगटातील मुलांनी लस टोचून घ्यावी आणि शिक्षणसंस्थेत प्रवेश करावा.

सोमवार २४ जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार

महाराष्ट्रातील पहिली ते बारावी पर्यंतचे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सोमवार २४ जानेवारी २०२२ पासून पुन्हा सुरू होत आहेत. स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी कोरोना संकट नियंत्रणात असेल तिथे प्रशासन शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेईल; अशी माहिती महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याआधी राज्य शासनाने कोरोना संकटाचे कारण देऊन पहिली ते बारावी पर्यंतचे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण नगण्य आहे यामुळे शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करण्याची मागणी अनेक शिक्षक तसेच पालक संघटनांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन सोमवारपासून शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी