Section 144 imposed in mumbai : मुंबई : ओमायक्रॉनचे संकट पाहता मुंबईत पुढील १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थर्टी फर्स्ट साजरा करता येणार नाही. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (Section 144 imposed in mumbai next 16 days over omicron)
आतापर्यंत देशात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक आमक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुढील १६ दिवसांसाठी मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सापडलेल्या ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्णांची कुठलीच ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जमावबंदीनुसार आता मुंबईत पाच पेक्षा जास्त जणांना एकत्र जमता येणार नाही. त्याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मंगळवारी महाराष्ट्र ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण सापडले अहएत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जे आठ रुग्ण आढळले आहेत ते सर्व कुठेही परदेशात गेलेले नाहीत. तसेच राज्यात सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. त्यापैकी सात रुग्ण मुंब्नईतील असून तीन महिला रुग्णांचाही त्यात समावेश आहे.
ज्या आठ रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे, त्यापिकी सात जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोनी डोस देण्यात आले आहेत. सर्व रुग्ण २४ ते ४१ वयोगटातले असून आठ रुग्णांपैकी तीन रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणे नाहीत. तर उर्वरित पाच रुग्णांमध्ये आजाराची हलकी लक्षणे आहेत. आठ रुग्णांपैकी एकही रुग्ण परदेशातून परतला नसल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. संक्रमित रुग्णांपैकी एक रुग्ण बंगळूरूहून परतला आहे. तर एक रुग्ण दिल्लीहून परतला आहे. आठ रुग्णांपैकी दोन रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून सहा रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. या रुग्णांच्या जे जे संपर्कात आले आहेत त्यांचा शोध सुरू आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.