Nawab Malik on Devendra Fadnavis : मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब बनावट नोटांवर आदळला; बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा: नवाब मलिक

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 10, 2021 | 12:35 IST

Nawab Malik on Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी (Nawab Malik) पत्रकार परिषद (Press conference) घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

Security of Fadnavis government racket of counterfeit Notes : Nawab Malik
बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा: नवाब मलिक  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं.
  • खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचे काम समीर वानखेडेंनी केलं.
  • बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादाने सुरू होता.

Nawab Malik on Devendra Fadnavis : मुंबई: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी (Nawab Malik) पत्रकार परिषद (Press conference) घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. आपल्या आरोपांमुळे फडणवीसांची झोप उडाली असल्याचं ट्विट मलिकांनी सकाळी केलं होतं. 

पत्रकार परिषदेत आरोप करताना मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं. सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादाने सुरू होता. बनावट नोटांचे पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचे रॅकेट चालवत होते त्याला तत्कालीन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता, असा आरोप मलिकांनी केला आहे. मलिक म्हणाले की, खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचे काम समीर वानखेडेंनीच केलं. खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते, असं ते म्हणाले. खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेख हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन अल्पसंख्याक कमिशनचा अध्यक्ष आहे, असं मलिक म्हणाले. 

रियाझ भाटी दाऊद इब्राहीमचा माणूस 

मलिक म्हणाले की, बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला पकडले होते. तो अद्यापही फरार आहे. सगळ्या शहराला माहिती आहे हा रियाज भाटी कोण आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जात त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो.  पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत. एखादा गुंड, क्रिमीनल सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा असा सवाल मलिक यांनी केला आहे. 

 देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत मुन्ना यादव

नागपूरचा मुन्ना यादव यांच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे. त्याला महामंडळाचे अध्यक्ष केले होते. हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. तो बंग्लादेशातील नागरिकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो. त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे, असा घणाघात मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला. दरम्यान, याप्रकरणी मालाड पोलीस केस दाखल करत असताना तुम्ही पोलिसांवर दबाव आणून ते थांबवले. फडणवीस यांच्या काळात जमीन मालकांना आणून सगळी जमीन नावावर करून घेतली जात होती. परदेशातून गुंड फोन करत होते आणि पोलीस प्रकरण दाबत होते, असा आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.

वसुलीचे काम फडणवीसांच्या काळात झाले

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात वसुलीचे काम झाले. त्यांनी मुन्ना यादव आणि हैदर आझम यांचे पालनपोषण केले आणि त्यांना आश्रय दिला. अंडरवर्ल्डचे लोक गुन्हे करायचे आणि फडणवीस सरकार त्यांना संरक्षण द्यायचे. 'नागपूरच्या गुंड मुन्ना यादवला पद का दिले? बांग्लादेशी हैदर आझम यांना भारतीय नागरिक बनवण्याचे काम फडणवीस यांनी केले आणि त्यांना महामंडळाचे पद दिले. संपूर्ण महाराष्ट्रात संकलनाचे काम तुमच्या (फडणवीस) सांगण्यावरून होत होते की नाही? ते बिल्डरांकडून वसूली करत होती की नाही?, असे मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी