काँग्रेसला नेमकी कोणती खाती मिळाली?, यादी एका क्लिकवर 

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 05, 2020 | 13:55 IST

Congress Ministers Portfolios: राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात काँग्रेसला अनेक खाती मिळाली आहेत. या खातेवाटपात काँग्रेसला महसूल, सार्वजनिक बांधकाम, उर्जा ही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. 

see full list of congress ministers portfolios mahavikas aghadi govt mahrashtra 
काँग्रेसला नेमकी कोणती खाती मिळाली?, यादी एका क्लिकवर   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
 • महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, शालेय शिक्षणसारखी महत्त्वाची खाती काँग्रेसच्या वाट्याला
 • महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला १२ मंत्रिपदं

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १५, राष्ट्रवादी काँग्रेसला १६ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळाली आहे. या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला सर्वात कमी मंत्रिपदं मिळाली आहेत. कारण की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा कमी निवडून आल्या आहेत. त्यामुळे सत्तावाटपात १२ मंत्रिपदंच काँग्रेसला देण्यात आली. पण यावेळी महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, शालेय शिक्षण आणि गृहराज्यमंत्री अशी महत्त्वाची पदं त्यांना मिळाली आहेत. 

पाहा काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळाली: 

 1. बाळासाहेब थोरात - महसूल
 2. अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
 3. नितीन राऊत - ऊर्जा 
 4. विजय वड्डेटीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
 5. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
 6. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक 
 7. के सी पाडवी - आदिवासी विकास
 8. यशोमती ठाकूर - महिला व बालविकास
 9. सुनील केदार - दुग्धविकास, पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण 
 10. अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
 11. सतेज पाटील - (राज्यमंत्री) गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
 12. विश्वजित कदम - (राज्यमंत्री) सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

दरम्यान, सुरुवातीला खातेवाटपावरुन काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याचं समोर आलं होतं. याच नाराजीमुळे खातेवाटपाला उशीर झाल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. या मंत्रिमंडळात कमी महत्त्वाची खाती काँग्रेसला मिळत असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळाल्यानंतर काँग्रेसने खातेवाटपाला मंजुरी दिली. त्यानंतर महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर झालं. दरम्यान, काँग्रेसमधील अनेक आमदार या मंत्रिमंडळामुळे नाराज असल्याचंही समजतं आहे. त्यामुळे आता या नाराज आमदारांची काँग्रेस नेते कशाप्रकारे समजूत घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी