अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला, पाहा ही संपूर्ण यादी

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 05, 2020 | 13:13 IST

Ncp Ministers Portfolios: राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप करण्यात आलं असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक महत्त्वाची खाती मिळाली आहेत. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला एकूण १५ मंत्रिपदं मिळाली आहेत.

see full list of ncp ministers portfolios ncp's success in gaining many important portfolios
अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला, पाहा ही संपूर्ण यादी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वात जास्त आणि महत्त्वाची खाती
 • गृह, अर्थ, गृहनिर्माण, जलसंपदा, उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे
 • मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ मंत्र्यांचा समावेश

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काही वेळापूर्वीच जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ मंत्र्यांना वेगवेगळी खाती वाटण्यात आली आहेत. या संपूर्ण मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अत्यंत महत्त्वाची खाती आल्याचं सध्या दिसून येत आहे. कारण की, अर्थ, गृह, जलसंपदा, उत्पादन शुल्क, ग्रामविकास, गृहनिर्माण, सहकार आणि अन्न व नागरी पुरवठा यासारखी अत्यंत महत्त्वाची खाती ही त्यांना मिळालेली आहेत. त्यामुळे या खातेवाटपात राष्ट्रवादीचाच वरचष्मा असल्याचं दिसतं आहे. 

पाहा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळाली: 

 1. अजित पवार (उपमुख्यमंत्री) - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
 2. जयंत पाटील - जलसंपदा
 3. छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
 4. अनिल देशमुख - गृह
 5. दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
 6. धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
 7. हसन मुश्रीफ - ग्रामविकास
 8. बाळासाहेब पाटील - सहकार
 9. राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
 10. राजेश टोपे - आरोग्य
 11. जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
 12. नवाब मलिक - कामगार, अल्पसंख्याक विकास
 13. आदिती तटकरे - (राज्यमंत्री) उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
 14. संजय बनसोडे - (राज्यमंत्री) पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
 15. दत्तात्रय भरणे - (राज्यमंत्री) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृदा व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन
 16. प्राजक्त तनपुरे- राज्यमंत्री) नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 

यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागासोबतच शहरी भागाशी निगडीत असलेली खाती स्वत:कडे घेतली आहे. ज्या माध्यमातून ग्रामीण भागासोबतच शहरी भागात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार त्यांना करता येणार आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अशा प्रकारची खाती आपल्या पक्षाला मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यावेळी कृषी खात्यासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं हे शिवसेनेने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी