शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळाली 'ही' खाती, पाहा संपूर्ण यादी

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 05, 2020 | 11:45 IST

Shiv Sena Ministers Portfolios: राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं असून शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह एकून १५ मंत्रिपदं आली आहे. पाहा या १५ मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळाली आहेत.

see full list of shiv sena ministers portfolios
शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळाली 'ही' खाती, पाहा संपूर्ण यादी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेच्या वाट्याला १५ मंत्रिपदं
 • ३ अपक्ष आमदारांना मिळाली मंत्रिपदं
 • आदित्य ठाकरेंना पर्यावरण आणि पर्यटन यासारखी महत्त्वाची खाती

मुंबई: राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांना आता आपआपली खाती मिळाली आहेत. काही वेळापूर्वीच खातेवाटपाची अधिकृत यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्वच ४३ मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेच्या एकूण १२ आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या तीन मंत्र्यांना खाती देण्यात आली आहेत. या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पदासह एकूण १५ मंत्रिपदं शिवसेनेच्या वाट्याला आली आहेत. यावेळी मुख्यमंत्रीपदी स्वत: उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. तर  शिवसेनेने आपल्या एकूण ११ आमदारांना मंत्रिपदं दिली आहेत. तर ज्या ३ अपक्ष आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. ज्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दिला आहे.

पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळाली: 

 1. उद्धव ठाकरे - (मुख्यमंत्री) - सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय - खाती 
 2. एकनाथ शिंदे - नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 
 3. सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
 4. आदित्य ठाकरे- पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
 5. उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण 
 6. अनिल परब - परिवहन, संसदीय कामकाज
 7. संदीपपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन
 8. गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता
 9. दादा भुसे - कृषी, माजी सैनिक कल्याण 
 10. संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 
 11. शंभूराज देसाई - (राज्यमंत्री) गृह (ग्रामीण), अर्थ, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
 12. अब्दुल सत्तार - (राज्यमंत्री) महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले अपक्ष आमदार 

 1. शंकरराव गडाख - (कॅबिनेट मंत्री) मृदा व जलसंधारण
 2. बच्चू कडू - (राज्यमंत्री) जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक वि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार
 3. राजेंद्र यड्रावकर -  (राज्यमंत्री) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी