Hussain Dalwai Death | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचं निधन

मुंबई
भरत जाधव
Updated May 17, 2022 | 06:53 IST

राज्याचे माजी न्यायमंत्री (Former Minister of Justice), माजी लोकसभा (Former Lok Sabha) आणि राज्यसभा खासदार (Rajya Sabha MP) तसेच खेडचे माजी आमदार (MLA) राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (Hussain Dalwai Death) यांचं निधन झालं आहे. दलवाई यांनी मुंबईत जगाचा निरोप घेतला.  ते 99 वर्षांचे होते. दलवाई यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Hussain Dalwai Death
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचं निधन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • हुसेन दलवाई हे अस्खलित मराठी बोलणारे, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर विद्वत्तापूर्ण प्रभूत्त्व असणारे नेते होते.
  • गेली सुमारे 20-22 वर्षे ते राजकारणापासून दूर होते.
  • हुसेन दलवाई यांनी आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री अशी अनेक पद यशस्वीरित्या भूषवली

मुंबई :  राज्याचे माजी न्यायमंत्री (Former Minister of Justice), माजी लोकसभा (Former Lok Sabha) आणि राज्यसभा खासदार (Rajya Sabha MP) तसेच खेडचे माजी आमदार (MLA) राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (Hussain Dalwai Death) यांचं निधन झालं आहे. दलवाई यांनी मुंबईत जगाचा निरोप घेतला.  ते 99 वर्षांचे होते. दलवाई यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अस्खलित मराठी बोलणारे, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर विद्वत्तापूर्ण प्रभूत्त्व असणारे दलवाई हे पहाता क्षणी त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल असे व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्न चेहऱ्याने सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेत असत.

गेली सुमारे वीसबावीस वर्षे ते राजकारणापासून दूर होते. पण राजकारणी माणसांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते. ते कट्टर काँग्रेसवासी होते, तरीही विरोधी पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन असत. त्यांचा उल्लेख सिनियर असा केला जातो. दलवाई यांचा राजकारणातील दांडगा अनुभव होता. त्यांनी आमदार, खासदार,  कॅबिनेट मंत्री अशी अनेक पद यशस्वीरित्या भूषवली.

हुसेन दलवाई यांच्याबाबत थोडक्यात

हुसेन दलवाई हे चिपळूण शहरातील मिरजोळी गावचे रहिवाली होते. चिपळूणमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली देखील केली होती. त्यानंतर त्यांनी खेडमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. खेड तालुक्यातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत ते विजयी झाले होते. काँग्रेसकडून त्यांना दोनवेळा राज्यसभेची खासदारकी मिळाली होती. तसंच त्यांनी काँग्रेसकडून राज्यमंत्रिपदही भुषवलं होतं.

दलवाई यांनी 1962 ते 78 या कालावधी दरम्यान खेड विधानसभा मतदारसंघातं प्रतिनिधित्व केलं. दलवाईंनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. यानंतर त्यांना संसदेत राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. मे 1984 मध्ये त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. राज्यसभेत संधी मिळाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जनतेनी त्यांना निवडून दिलं. 

खेड आणि चिपळूणच्या दरम्यान आज जी लोटे-परशुराम ही औद्योगिक वसाहत दिसते, ती दलवाई यांनी राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्याकडे हट्ट धरून मंजूर करून घेतलेली आहे. आज खेड तालुका पाण्याने समृध्द आहे. त्याला कारणीभूत ठरलेला नातूनगरचा जलप्रकल्प दलवाईसाहेबांनीच मंजूर करून घेतला आणि तालुक्याचा बराच भाग सुजलाम झाला. खेड तालुक्यात आज असलेली मध्यम व लघु धरणे दलवाई यांच्याच काळात झालेली किंवा त्यांनी आखणी केलेली आहेत. 

विविध क्षेत्रातून शोक व्यक्त 

हुसेन दलवाई यांच्या निधनामुळे अनेक स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शोक व्यक्त केला. सचिन सावंत यांनी दलवाई यांच्यासोबतचा 3 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी