'या' जेष्ठ गायिकेचे निधन , पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

senior singer dies in pune : मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय आणि गायनाच्या जोरावर आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

senior singer dies in pune
'या' जेष्ठ गायिकेचे निधन, मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय आणि गायनाच्या जोरावर आपली खास ओळख निर्माण केली होती
  • शिलेदार यांनी तब्बल ६० वर्षे रंगभूमीवर आपली कला सादर केली आहे.
  • कीर्ती शिलेदार या ७० वर्षांच्या होत्या

मुंबई -   प्रसिद्ध रंगकर्मी आणि ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार  (Kirti Shiledar)   यांचं आज आकस्मिक निधन झालं आहे. गायिका कीर्ती शिलेदार  यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. किर्ती शिलेदार यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांनी गेली ६० वर्षे रंगभूमीला दिली आहेत. कीर्ती शिलेदार या ७० वर्षांच्या होत्या. आज सकाळची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. परंतु त्यांनी तब्बल ६० वर्षे रंगभूमीवर आपली कला सादर केली आहे.

मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय आणि गायनाच्या जोरावर आपली खास ओळख निर्माण केली होती

मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय आणि गायनाच्या जोरावर आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, शिलेदार यांनी आपल्या वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वानांच आपलस केलं होतं. अभिनयच नव्हे तर त्यांनी आपल्या आवाजाची जादूसुद्धा सर्वांवर पसरवली होती. त्या अभिनेत्रीसोबतच एक उत्कृष्ट गायिका म्हणून त्यांची मोठी ओळख होती.

लतादीदींविषयी कोणीही कोणतीही अफवा पसरवू नये आणि चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - अधिकृत प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (९२) यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. लतादीदी हॉस्पिटलच्या आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात (Intensive Care Unit - ICU) ९ जानेवारी २०२२ पासून उपचार घेत आहेत. वयाचा विचार करता लतादीदींना उपचारांसाठी किमान दहा ते बारा दिवस आयसीयूमध्ये ठेवावे लागेल; असे डॉ प्रतीत समधानी यांनी आधीच सांगितले आहे. यामुळे लतादीदींविषयी कोणीही कोणतीही अफवा पसरवू नये आणि चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; असे आवाहन अधिकृत प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी केले. लतादीदींवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे; असेही अनुषा यांनी सांगितले. 

त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी देवाकडे प्रार्थना करायला हरकत नाही पण अफवा पसरवू नका – अय्यर

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची माहिती अनुषा यांच्यामार्फत माध्यमांनी दिली जात आहे. पण काही माध्यमांनी लतादीदी अनेक दिवसांपासून आयसीयूमध्ये असल्याचा मुद्दा पुढे करून अपुऱ्या माहितीआधारे वृत्त दिले आहे. यामुळे अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे. पण या अफवांवर विश्वास ठेवू नका. लतादीदींचे उपचार सुरू आहेत. त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी देवाकडे प्रार्थना करायला हरकत नाही पण अफवा पसरवू नका; असे अधिकृत प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी