मुंबईत सात जणांना सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या बनावट नोटांसह अटक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 27, 2022 | 04:18 IST

Seven arrested in Mumbai with 2000 counterfeit notes worth Rs 7 crore : सात जणांना सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या पस्तीस हजार बनावट नोटांसह अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या युनिटने दहिसरमध्ये सापळा रचून ही कारवाई केली. अटक केलेल्या सात आरोपींना कोर्टाने ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी दिली.

Seven arrested in Mumbai with 2000 counterfeit notes worth Rs 7 crore
मुंबईत ७ जणांना ७ कोटींच्या २ हजाराच्या बनावट नोटांसह अटक 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत सात जणांना सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या बनावट नोटांसह अटक
  • आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
  • सखोल पोलीस तपास सुरू

Seven arrested in Mumbai with 2000 counterfeit notes worth Rs 7 crore : मुंबई : सात जणांना सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या पस्तीस हजार बनावट नोटांसह अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या युनिटने दहिसरमध्ये सापळा रचून ही कारवाई केली. अटक केलेल्या सात आरोपींना कोर्टाने ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी दिली.

काही जण बनावट नोटांसह मुंबईत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी दहिसरमध्ये सापळा रचला. आरोपींच्या गाडीने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ती अडवून सखोल चौकशी करण्यात आली. पोलीस तपासात गाडीत पाच कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या बनावट नोटा सापडल्या. दोन हजाराच्या पंचवीस हजार बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. गाडीत बसलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर आरोपींनी सहकाऱ्यांची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी अम्फा हॉटेलवर धाड टाकून दोन कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या दहा हजार नोटा जप्त केल्या. संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सात जणांना अटक केली. 

गाडीत तसेच हॉटेलमध्ये कारवाई करून पोलिसांनी सात जणांना अटक केली आणि सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या पस्तीस हजार बनावट नोटा जप्त केल्या. नोटा आल्या कुठून आणि या प्रकरणात कोण कोण गुंतले आहे याचा तपास पोलीस करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी