Several organisations demand for restart schools : मुंबई : शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या खासगी कंपन्यांना अप्रत्यक्षरित्या मोठा फायदा मिळवून देणे बंद करा. कोरोना संकट नियंत्रणात आहे तर महाराष्ट्रातील शाळा सुरू करा; अशी मागणी शिक्षण क्षेत्राशी संबंधित राज्यातील अनेक संघटनांनी केली आहे. शिक्षण हक्क मंच, बालहक्क संघटना, बालमजुरीविरोधी अभियान, मैत्री संघटना, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ, राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शाळा सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा सरकारकडे मागणी लावून धरली आहे.
राज्यातील शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. मात्र शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याच्या धोरणाचा गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. ज्या घरात एकपेक्षा जास्त मुले आहेत अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षणासाठी दोन मोबाइल घेणे सर्वांनाच परवडणारे नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित मिळत नाही. यामुळे जिथे कोरोना नियंत्रणात आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग नगण्य आहे. ज्यांना संसर्ग झाला अशा मुलांची तब्येत सुधारण्याचा वेग जास्त आहे. राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आहे असे महाराष्ट्र शासन सांगत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे तर शाळा का बंद ठेवल्या आहेत. राज्यात इतर अनेक ठिकाणी मास्क लावून मुलं जा-ये करत आहेत. मग शाळा बंद ठेवण्याचे कारण काय; असा सवाल अनेक संघटनांनी राज्य शासनाला केला आहे.
अटी घालून अनेक कार्यक्रमांनी परवानगी दिली जाते. मग कोविड प्रोटोकॉल पाळण्याच्या अटी घालून शाळा सुरू करणे शक्य नाही का; असाही सवाल अनेक संघटांकडून राज्य शासनाला होत आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांमध्ये कोरोना संकट सुरू असूनही शाळा सुरू ठेवल्या आहेत. मग आपल्या शाळा अद्याप बंद का; असा रोखठोक सवाल संघटनांनी राज्य शासनाला केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.