Andheri Fire News : अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरात भीषण आग; चार ते पाच दुकानं जळून खाक

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 02, 2022 | 16:24 IST

मुंबईतील (Mumbai) अंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात (Western station area) आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीने मोठा भडका घेत तीन ते चार दुकाने (shops) आपल्या विळख्यात घेतलं. 

Severe fire in Andheri West station premises
अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरात भीषण आग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल
  • आगीत चार ते पाच दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे.
  • सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

Andheri West Fire Accident : मुंबईतील (Mumbai) अंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात (Western station area) आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीने मोठा भडका घेत तीन ते चार दुकाने (shops) आपल्या विळख्यात घेतलं.  या घटनेची माहिती मिळताच,अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.  (Severe fire in Andheri West station premises; Four to five shops burnt down)

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत चार ते पाच दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. याशिवाय अंधेरी (Andheri) रेल्वे हद्दीतील काही भाग सुद्धा जळून खाक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजे शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात असलेल्या दुकानांना अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. या संदर्भात संदर्भात डी.एन.नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी