मुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक

मुंबई
Updated Oct 19, 2019 | 11:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sex Racket busted in Mumbai: मुंबईत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सेक्स रॅकेट चालवणारा व्यक्ती हा एक बँक कर्मचारी असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांनी कारवाई करत हा पर्दापाश केलाय.

sex racket busted mumbai police foreigner girls rescued crime branch bank employee arrested crime news marathi
मुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, बँक कर्मचाऱ्याला अटक (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
  • दोन परदेशी मुलींची सुटका 
  • बँक कर्मचारी चालवत होता सेक्स रॅकेट 
  • मुंबई पोलिसांनी धाड टाकून केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी बँक कर्मचाऱ्याला अटक केली आहे. हा बँक कर्मचारीच सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचं नाव नदीम नसीर खान (२६ वर्षे)  असे आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली असून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट ७ ला एक गुप्त माहिती मिळाली होती की, एक बँक कर्मचारी सेक्स रॅकेट चालवत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता माहिती खरी असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. 

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँच पथकाने बनाव ग्राहक पाठवला आणि त्या ग्राहकाने आरोपी नदीम नसीर खान याच्यासोबत संपर्क साधला. आरोपी नदीम याने एका हॉटेलमध्ये दोन परदेशी महिलांचा वेश्या व्यवसायासाठी व्यवहार केला. यावेळी आरोपी नदीम नसीर खान याने परदेशी मुली पुरवण्याचं आश्वासन देत जागा सुद्धा सांगितली. तर, डमी ग्राहकाने आरोपीला काही पैसे सुद्धा दिले. 

यानंतर आरोपी नदीम याने मालाड येथील एका हॉटेलमध्ये दोन परदेशी मुलींना बोलावले. तसेच ग्राहकालाही तेथेच भेटण्यासाठी बोलावले. डमी ग्राहकाने उर्वरित रक्कम देत असतानाच पोलिसांनी धाड टाकली आणि आरोपी नदीम याला अटक केली. यावेळी पोलिसांनी उझबेकीस्तानमधील दोन मुलींची सुटका केली. या दोन्ही मुली उझबेकीस्तान येथून पर्यटन व्हिसावर भारतात आल्या होत्या. जास्त पैसे देण्याचं आमीष दाखवून नदीम याने दोन्ही मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास सांगितले.

मुंबई पोलिसांनी आरोपी नदीम नसीर खान याला बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरुद्धा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. आरोपी नदीम याच्यासोबत सेक्स रॅकेट चालवण्यात इतरही कोणी सहभागी होते का? या संदर्भातही पोलीस तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी