shakti bill passed in maharashtra assembly : मुंबईः महिला अत्याचाराच्या विरोधात तातडीने आणि कठोर शिक्षा बजावण्यासाठी तयार करण्यात आलेले शक्ती विधेयक महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. राज्यपालांच्या स्वाक्षरीने या विधेयकाचे लवकरच कायद्यात रुपांतर होईल.
राज्यातील महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटना थांबाव्या यासाठी शक्ती विधेयकात कठोर तरतुदी आहेत. बलात्कार, ॲसिड हल्ला, सोशल मीडियातून होणारी बदनामी, बालकांवरील खालच्या पातळीची टीका, आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो प्रसिद्ध करुन केली जाणारी बदनामी अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद शक्ती विधेयकात आहे.
शक्ती कायद्याच्या कक्षेत पुरुष, महिला आणि तृतीयपंथी यांचा समावेश आहे. शक्ती कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविल्यास ३० दिवसांत तपास पूर्ण करण्याचे बंधन पोलिसांवर असेल. तसेच ३० दिवसांत तपास पूर्ण झाला नाही तर पोलिसांना आणखी ३० दिवसांची मुदतवाढ न्यायालयात अर्ज करुन घेता येईल. लैंगिक गुन्ह्यांच्या संदर्भात खोटी तक्रार केल्याचे सिद्ध झाले अथवा खोटी तक्रार करुन त्रास दिल्याचे सिद्ध झाले तर तक्रारदारास अटक होऊ शकते. अशी अटक झाल्यास जामीन मिळणार नाही आणि खोटी तक्रार नोंदविल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर शिक्षा होईल.
शक्ती कायद्यांतर्गत दोषी ठरलेल्या ॲसिड हल्ल्यातील गुन्हेगाराला १५ वर्षांची कोठडी आणि जन्मठेप अशा शिक्षेची तरतूद शक्ती कायद्यात आहे. सोबत दंडाची तरतूदही आहे. दंडाच्या रकमेतून अॅसिड हल्ल्यातील पीडितेला वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.