‘शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय ऐनवेळी बदलला कारण...’, पुस्तकात नवा दावा

मुंबई
Updated Nov 26, 2020 | 12:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर चालू झालेल्या राजकीय रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

Supriya Sule and Sharad Pawar
‘शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय ऐनवेळी बदलला कारण...’ पुस्तकात केला नवा दावा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे पवारांचे होते स्वप्न
  • अमित शहा यांच्या निवासस्थानी झाली होती बैठक
  • अजित पवारांनी फडणवीस यांना दिले होते हे आश्वासन

मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीनंतर (assembly election) चालू झालेल्या राजकीय रणधुमाळीत (political upheaval) राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) मोठी महत्वाची भूमिका (significant role) बजावली. त्यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला (decision to support BJP) होता. मात्र त्यांनी आयत्यावेळी तो (changed at last moment) बदलला. इतकेच नाही, तर भाजपाच्या विरोधातल्या शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेससोबत (Congress) जाण्याचे त्यांनी ठरवले. ‘पावर ट्रेडिंग’ (Power Trading) या पुस्तकात (book) महाराष्ट्राच्या तत्कालीन राजकीय घडामोडींमध्ये पवारांच्या भूमिकेबद्दल हा दावा (claim) करण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे पवारांचे होते स्वप्न

शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री करण्याचे शरद पवार यांच्या मनात होते. या स्वप्नपूर्तीसाठी राज्यात महाविकासआघाडी सरकार येणे इष्ट ठरेल असे त्यांना वाटले. त्यामुळेच त्यांनी आयत्या वेळी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला आणि काँग्रेस-शिवसेनेसोबत युती केली असा दावा ‘पावर ट्रेडिंग’ या पुस्तकात प्रियम गांधी यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बातचीत करताना त्यांनी अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या की शरद पवार सुरुवातीला भाजपाला पाठिंबा देणार होते आणि राष्ट्रवादीच्या एका माजी केंद्रीय मंत्र्याच्या माध्यमातून भाजपाशी वाटाघाटीही चालू होत्या.

अमित शहा यांच्या निवासस्थानी झाली होती बैठक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी शहा, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची एक बैठक झाली. मात्र नंतर शरद पवार यांनी अचानक निर्णय बदलला. याबद्दलची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचवली होती. त्याने फडणवीस यांना सांगितले होते की शरद पवारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता धूसर आहे. कारण त्यांना आपला वारसा जपायचा आहे. त्यांचे वय बरेच आहे आणि त्यांची राजकीय अस्ताकडे झुकलेली आहे.

अजित पवारांनी फडणवीस यांना दिले होते हे आश्वासन

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढती जवळीक पाहता देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याशी चर्चा केली. त्यावेळी या नेत्याने अजित पवार यांचा शिवसेनेसोबत जाण्यास विरोध आहे आणि ते भाजपासोबत सत्ता स्थापन करू शकतात असे त्यांना सांगितले होते. तसेच सुप्रिया सुळेंसोबत अजित पवारांचे शीतयुद्ध चालू आहे आणि अजितदादांचा मुलगा पार्थ पवार यांना मागे टाकून रोहित पवारांना वर आणण्याचे प्रयत्न होत असल्याने ते नाराज आहेत असेही त्याने सांगितले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी