Sharad Pawar : सत्ता गमावल्यानंतर काही लोक अस्वस्थ होतात, देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता शरद पवार यांचा टोला

सत्ता गमावल्यानंतर काही लोक अस्वस्थ होतात असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला आहे. तसेच राज्य सरकारने लाऊडस्पीकरवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे त्यावर नक्कीच योग्य निष्कर्ष बाहेर येतील असेही पवार म्हणाले.

sharad pawar
शरद पवार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सत्ता गमावल्यानंतर काही लोक अस्वस्थ होतात
  • राज्य सरकारने लाऊडस्पीकरवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे त्यावर नक्कीच योग्य निष्कर्ष बाहेर येतील
  • नेहमीच राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जाते, परंतुत त्यातून काही साध्य होत नाही.

Sharad Pawar : पुणे : सत्ता गमावल्यानंतर काही लोक अस्वस्थ होता असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला आहे. तसेच राज्य सरकारने लाऊडस्पीकरवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे त्यावर नक्कीच योग्य निष्कर्ष बाहेर येतील असेही पवार म्हणाले. 


पुण्यात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, नेहमीच राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जाते, परंतुत त्यातून काही साध्य होत नाही. उद्या जर निवडणुका झाल्या तर कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निकालाप्रमाणेच निकाल लागेल असे पवार म्हणाले. तसेच सत्ता येते आणि जाते. सत्ता गेल्यावर काही लोक अस्वस्थ होतात, मी त्यांना दोष देत नाही. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी दावे केले गेले की मी पुन्हा येऊ परंतु ते काही परत आले नाही असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. 

१९८० साली मी मुख्यमंत्री होतो, आमचे सरकार बरखास्त करण्यात आले. रात्री उशिरा साडे बारा वाजता याची मला माहिती मिळाली असे पवार म्हणाले. तसेच जेव्हा मुख्यमंत्रिपद आपल्या हातातून गेले असे मला कळाले तेव्हा तत्काळ आपण मुख्यमंत्री  निवास सोडले. दुसर्‍या दिवशी वानखेडे स्टेडियममध्ये मी माझ्या साथीदारांसोबत क्रिकेट सामना बघायला गेलो असेही पवार म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी