Sharad Pawar Pm Candidate : शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही- नवाब मलिक

उत्तर प्रदेशमध्ये भाजप आमदारांनी राजीनामे दिले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधी लाट आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. तसेच शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधी लाट
  • शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत
  • उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपा एकत्र निवडणूक लढवणार

Sharad Pawar PM Candidate : मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये भाजप आमदारांनी राजीनामे दिले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधी लाट आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. तसेच शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक म्हणाले की उत्तर प्रदेशमध्ये सपाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपा एकत्र निवडणूक लढवणार, जागावाटपावरूनही सर्व बोलणी झाल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांनी पक्षाला राम राम केला आहे, याचा अर्थ भाजपविरोधात लाट असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जस जशा जवळ येतील तशा आणखी रंजक गोष्टी दिसतील असेही मलाक म्हणाले. तसेच शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पवार भाजपला उत्तम पर्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पवार कधीच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नव्हते असेही मलिक यांनी यावेळी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी