Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.

Sharad Pawar is undergoing treatment in the hospital
Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, जाणून घ्या नेमकं काय झालं? ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांची प्रकृती खालावली
  • मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
  • बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देणार

मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते 4-5 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या पक्षाच्या शिबिरात सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले. (Sharad Pawar is undergoing treatment in the hospital)

अधिक वाचा : पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर; 2000 कोटींची गुंतवणूक येणार, 5000 रोजगार मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की, शिर्डीतील त्यांच्या पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, शरद पवार नांदेडमार्गे महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या 'भारत जोडी यात्रे'मध्येही भाग घेतील. यापूर्वी शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेऊन राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.

गेल्या वर्षीही शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर पित्ताशयाची  शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हे आजारी असतात. मात्र तरीही राजकीय आव्हानांपासून ते दूर जात नाहीत. राज्यभरात त्यांचे दौरे सुरु असतात. ते सतत राजकारणात सक्रिय आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 

अधिक वाचा : NAVI MUMBAI मध्ये अघोरी प्रकार; पोटच्या दोन मुलांचा गळा चिरून आईने स्वत:ला लटकवलं पंख्याला पण...

दरम्यान, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ब्रीच कँडी हाॅस्पिटलच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहनही राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आलं आहे. मात्र, शरद पवार यांना नेमकं काय झालं? याची माहिती कळू शकली नाही. त्यामुळे पवार ब्रीच कँडीत नेमका कशावर उपचार घेणार हे समजू शकले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी