आताची मोठी बातमी: शरद पवारांनी 'या' वृत्तावर केलं शिक्कामोर्तब

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 17:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sharad Pawar reaction over NCP meeting: राज्यातील सत्ता संघर्षाचा अद्यापही कायम आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली एक बैठक बोलावली आहे. १२ नोव्हेंबर रोजी ही बैठक होणार आहे.

sharad pawar ncp mla meeting 12th november 2019 jayant patil vidhan sabha election news marathi
आताची मोठी बातमी: शरद पवारांनी 'या' वृत्तावर केलं शिक्कामोर्तब 

थोडं पण कामाचं

  • १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक 
  • बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार, नेते राहणार उपस्थित
  • राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व
  • राज्यातील सत्ता संघर्ष संपणार?

मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्षावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाल्याचं दिसत आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक महत्वाची बैठक बोलावली आहे. येत्या १२ नोव्हेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक बोलवल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

राज्यात सध्या निर्माण झालेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या या बैठकीला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. या बैठकीसंदर्भात एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटलं, १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक बोलवली आहे असून मला त्याबद्दल जास्त माहिती नाहीये. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारा ते अधिक माहिती सांगतील. मला सुद्धा बैठकीसाठी फोन आला आहे आणि या बैठकीला उपस्थित राहणार आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच दोन्ही पक्षांतील तणाव अधिक वाढला आहे. या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२ नोव्हेंबर रोजी बोलावलेल्या बैठकीत शरद पवार नेमका काय निर्णय घेतात हे पहावं लागेल. शरद पवार शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं मन वळवतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि त्यासोबतच काँग्रेस पक्षाने बाहेरुन पाठिंबा दिला तर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं मिळून सरकार स्थापन होऊ शकतं. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयारी दर्शवली असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, या संदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...