Supriya Sule : शरद पवारांनी गांधी घराण्याच्या वारसावर आणि काँग्रेस पक्षावर दावा नाही सांगितला, सुप्रिया सुळेंचा शिंदे गटाला टोला 

Supriya Sule : काँग्रेस नेत्यांसोबत शरद पवारांचे मतभेत झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना पक्ष सोडून जाण्यास सांगितले, पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. परंतु पवारांनी कधीच गांधी घराण्याचा वारसा आणि काँग्रेस पक्षावर दावा नाही केला असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. तसेच ज्या हातांनी तुम्हाला भरवलं त्याच हाताचा चावा घ्यायचा नसतो असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

supriya sule with sharad pawar
सुप्रिया सुळे आणि शरद पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस नेत्यांसोबत शरद पवारांचे मतभेत झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना पक्ष सोडून जाण्यास सांगितले,
  • पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. परंतु पवारांनी कधीच गांधी घराण्याचा वारसा आणि काँग्रेस पक्षावर दावा नाही केला
  • से म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Supriya Sule : मुंबई : काँग्रेस नेत्यांसोबत शरद पवारांचे मतभेत झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना पक्ष सोडून जाण्यास सांगितले, पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. परंतु पवारांनी कधीच गांधी घराण्याचा वारसा आणि काँग्रेस पक्षावर दावा नाही केला असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. तसेच ज्या हातांनी तुम्हाला भरवलं त्याच हाताचा चावा घ्यायचा नसतो असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. (sharad pawar never claim congress party and gandhi family legacy says ncp mp supriya sule)

अधिक वाचा : Mumbai News : मुंबईच्या गर्दीत कुणाचा पाठलाग करणे शक्यच नाही, महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी आरोपीची कोर्टाकडून निर्दोष सुटका

कॉमेडियन कुणाल कामरा याने सुळे यांची मुलाखत घेतली, तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद झाले होते, तेव्हा काँग्रेस नेत्यांनी पवारांना पक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा पवारांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. पवारांनी कधीच इंदिरा गांधी माझ्या आई होत्या असा दावा केला नाही. शारदाबाई पवार याच माझ्या मातोश्री आहेत असे पवार म्हणायचे. तसेच पवारांनी कधीही काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याच्या वारसावर आपला हक्का नाही सांगितला. आज महाराष्ट्रात मैदानासाठी दोन्ही गट कोर्टात जात आहे ही चांगली बाब नाही असे सुळे म्हणाल्या. 

अधिक वाचा : उस्मानाबादेत सुषमा अंधारे यांची विरोधकांवर जोरदार टीका, ऐन दिवाळी सणात आमरण उपोषण करावे लागते आहे हे क्लेशदायक

त्या हाताचा चावा घ्यायचा नाही - सुळे

अनेक नेते आमच्या महाविकास आघाडीवर टीका करत आहेत, परंतु यातील अनेक नेते राज्यातील कुठल्या ना कुठल्या पक्षात होते असे सुळे म्हणाल्या. आता हे नेते नैतिकेच्या गोष्टी करत आहेत.  अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा कुणाला काहीच अडचण नव्हती. परंतु ज्या हातांनी आपल्याला भरवलं त्या हाताचा चावा घेणे मला चुकीचे वाटते. जर आपले मतभेद झाले तर मी माझा वेगळा मार्ग चोखाळेन परंतु असे करणे चुकीचे आहे. माझे बाबा शरद पवार यांचेही काँग्रेस नेत्यांसोबत मतभेद झाले तेव्हा त्यांनी स्वतःचा मार्ग निवडत पक्ष स्थापन केला असेही सुळे म्हणाल्या. 

अधिक वाचा : Hunger Strike : आमदार कैलास पाटील यांचा उपोषणाचा तिसरा दिवस, मागण्या अजून प्रतिक्षेत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी