थोड्याच वेळात शरद पवार फेसबुकवरुन जनतेशी साधणार संवाद

मुंबई
Updated Mar 27, 2020 | 08:43 IST

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत. शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करुन यासंदर्भातली माहिती दिली. 

Sharad Pawar
थोड्याच वेळात शरद पवार फेसबुकवरुन जनतेशी साधणार संवाद   |  फोटो सौजन्य: ANI

मुंबईः कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भयंकर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात वाढतो आहे. देशात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. तर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत.

जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण व्हावी, त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी शरद पवार जनतेशी संवाद साधतील. राज्यातील वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा आणि सुव्यवस्था या पार्श्वभूमीवर हा संवाद असणार आहे. शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करुन यासंदर्भातली माहिती दिली. 

शरद पवार यांची फेसबुक पोस्ट 

कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर उभ्या ठाकलेल्या महाभयानक आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा व सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा अनेक आव्हानांबाबत Sharad Pawar या माझ्या फेसबुक पेजवरून शुक्रवार दिनांक 27 मार्च 2020 रोजी सकाळी 11  वाजता आपल्याशी संवाद साधणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अशाच प्रकारची माहिती ट्विटरवर दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर खासदार प्रधानमंत्री सहाय्यता निधीत आपल्या एक महिन्याचं वेतन देणार, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.

या संदर्भात काढलेल्या अधिकृत पत्रकात शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य आणि केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आणि संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...