कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांचा खोटेपणा उघड

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 29, 2022 | 13:25 IST

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खोटेपणा उघड झाला. पवारांनी राजकीय स्वार्थासाठी खोटेपणा केला, असे भारतीय जनता पार्टीचे केशव उपाध्ये म्हणाले.

Sharad Pawar's lies exposed in Koregaon Bhima case
कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांचा खोटेपणा उघड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांचा खोटेपणा उघड
 • काहीही माहिती उपलब्ध नाही, कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही - शरद पवार
 • प्रतिज्ञापत्र देऊन चौकशी आयोगाला कळविले

मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खोटेपणा उघड झाला. पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पोलिसांनी खोटे पुरावे तयार केल्याचा दावा केला होता. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचे सत्य बाहेर काढण्यासाठी चौकशीची मागणी केली होती. प्रत्यक्षात चौकशी आयोगाने जेव्हा शरद पवार यांनाच चौकशीसाठी बोलावले त्यावेळी पवारांनी आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही असं प्रतिज्ञापत्र सादर केलंय. पवारांनी राजकीय स्वार्थासाठी खोटेपणा केला, असे भारतीय जनता पार्टीचे केशव उपाध्ये म्हणाले.

पवारांच्या पत्रानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे, मोदी सरकारची खेळी

शरद पवार कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात भाजपला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. भाजपच्या बदनामीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि पत्रकार परिषद घेतली. प्रत्यक्षात त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. स्वतः शरद पवार यांनीच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात काहीही माहिती उपलब्ध नाही असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. राजकीय स्वार्थासाठी एखाद्या पक्षावर आरोप करणे आणि त्याची बदनामी करणे हे करून शरद पवारांनी त्यांचे राजकारण खोटेपणाच्या आधारावर अवलंबून असल्याचेच दाखवून दिले, असे केशव उपाध्ये म्हणाले. ज्यांचे पूर्ण राजकारण खोटेपणावर अवलंबून आहे त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार, असेही केशव उपाध्ये म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कबीर कला मंचने पुण्यात शनिवार वाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या एल्गार परिषदेनंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत छापे टाकले होते. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला.

कोरेगाव-पुणे हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास करुन १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. तर या प्रकरणाचा सध्या तपास एनआयए करत आहे. एनआयएने २४ जानेवारी २०२० रोजी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर १४ एप्रिल रोजी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांना अटक केली. 

कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील तपासातले महत्त्वाचे मुद्दे

 1. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद, सीपीआय (माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेच्या कबीर कला मंचने ( Kabir Kala Manch) केले आयोजन
 2. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल
 3. पोलिसांनी १७ एप्रिल २०१८ रोजी पुणे, मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी छापे टाकले, छाप्यांनंतर पोलिसांनी हिंसेत माओवादी हात असल्याचा आरोप केला
 4. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपपत्र दाखल, २ फेब्रुवारी २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल
 5. ११ सप्टेंबर २०१९ रोजी हनी बाबूच्या घरावर छापा
 6. १४ एप्रिल रोजी आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) आणि गौतम नवलखाला (Gautam Navlakha) अटक
 7. २८ जुलै रोजी हनी बाबूला अटक
 8. कोरेगाव भीमा प्रकरणातील फिर्यादी आणि साक्षीदार सुरेश सकट यांचे पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी