मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group) नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक मॉर्फ व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. याप्रकरणी म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे गटावर आरोप करत पोलिसात तक्रार दिली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून पोलीस खाते आता सक्रीय झाले आहे. हा व्हिडिओ फॉरवर्ड करुन व्हायरल करणाऱ्या दोन जणांना दहिसर पोलिसांनी (Dahisar Police) अटक केली आहे. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ व्हिडीओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Sheetal Mhatre video case: two arrested for forwarding the video)
अधिक वाचा : या घरगुती उपयामुळे अंडरआर्म्सचा वास होईल दूर
शनिवारी रात्री हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रात्री उशिरा दहिसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
अधिक वाचा : पहिल्या आणि दुसऱ्या बाळाच्या जन्मामध्ये किती अंतर ठेवाल
फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजसह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी तो व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. त्यानंतर यावर संताप व्यक्त करत शीतल म्हात्रे आणि सुर्वे समर्थकानी दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करीत आहे. शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी रविवारी पहाटे याबाबत दहिसर पोलिसात तक्रार केली होती.
त्यानंतर हा व्हिडिओ फॉरवर्ड करून व्हायरल करणाऱ्या दोघांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलीस त्यांना अटक करणार असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ कोणी बनवला आणि कोणी व्हायरल केला याचा दहिसर पोलीस तपास करत आहेत.
अधिक वाचा : अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक
या प्रकारावर शीतल म्हात्रे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, "आज मी सुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहिण आहे. विरोधकांच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडिओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे दिसून येते. हा व्हिडिओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी."
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.