Shikshan Sevak Mandhan increase by Maharashtra Government: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारने शासन आदेश काढला आहे.
राज्यातील शिक्षण सेवकांना मिळणाऱ्या मानधनात सप्टेंबर 2011 नंतर वाढ करण्यात आलेली नव्हती. यापूर्वी 17 सप्टेंबर 2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार मानधन सुधारित करण्यात आले होते. त्यानुसार, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय यामधील प्रशिक्षित शिक्षण सेवकांचे मानधन, त्यांचे शैक्षणिक अर्हता आणि पदास अनुसरून 6000 रुपये ते 9000 रुपये निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर मानधनात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.
हे पण वाचा : जुळी मुलं होण्याची ही आहेत लक्षणे
दरम्यानच्या कालावधीत वाढती महागाई, राज्य स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक महाविद्यालयातील नियमित शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू झाली यामुळे शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे आवश्यक होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 30 जून 2022 रोजी शिक्षण सेवकांना देण्यात येणारे मानधन कमीत कमी कोणत्याही प्रकारच्या उद्योगातील वर्ग 4च्या कर्मचाऱ्यास देय किमान वेतनाएवढे सुधारित करण्यात यावे आणि मानधनाचे निश्चित दर चार वर्षांतून किमान एकदा सुधारीत करण्यात यावे. शिक्षण सेवकांना 15000 रुपये ते 20000 रुपये या दरम्यान मानधन अदा करण्याचे आदेश दिले होते.
हे पण वाचा : सात दिवसात व्हा आयर्न मॅन, फक्त करावं लागेल हे डाएट
त्यानंतर 22 डिसेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जाणून घ्या प्राथमिक, माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात किती वाढ करण्यात आली होती. या संदर्भातील शासन आदेशाची पीडीएफ फाईल पाहण्यासाठी gr.maharashtra.gov.in/Government.Resolutions/Marathi या लिंकवर क्लिक करा.
शिक्षण सेवकांचे वर्ग | शासन निर्णय दिनांक 17 सप्टेंबर 2011 अन्वये सध्या देण्यात येणारे मानधन | सुधारित मानधन |
प्राथमिक आणि उच्च माध्यमिक | 6000 रुपये | 16,000 रुपये |
माध्यमिक | 8000 रुपये | 18,000 रुपये |
उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय | 9000 रुपये | 20,000 रुपये |
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.