राष्ट्रवादीसोबतही 'शिंदे' प्रयोग सुरू! अजितदादांना जाळ्यात अडकवणार आणि भाजप एनसीपीला रडवणार?

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 13, 2023 | 18:58 IST

राज्यातील राजकारणात परत एकदा भूकंप येऊ शकतो हे  मागच्या काही दिवसांमधल्या घडलेल्या घटनांमुळे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकेच काय  राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

'Shinde' experiment started with NCP too! BJP Will Ajit Dada be trapped?
अजितदादांना जाळ्यात अडकवणार आणि भाजप एनसीपीला रडवणार?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादीचे जवळपास 20 आमदारांचा गट पक्षाविरोधात बंडाच्या तयारीत.
  • दोन दिवसापूर्वी अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाविषयी ट्विट केलं होतं.
  • अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत नाहीत.

मुंबई: राज्यातील राजकारणात परत एकदा भूकंप येऊ शकतो हे  मागच्या काही दिवसांमधल्या घडलेल्या घटनांमुळे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकेच काय 
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय भूकंपाची चर्चेने  जोर धरला आहे. ('Shinde' experiment started with NCP too! BJP Will Ajit Dada be trapped?)

अधिक वाचा  : आराध्या बच्चन पाहिलं तर म्हणाल, माय तशी लेक

तर राष्ट्रवादीचे जवळपास 20 आमदारांचा गट पक्षाविरोधात बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचबरोबर महाविकासआघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मंगळवारी सिल्व्हर ओकवर शरद पवारांना भेटायला गेले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊतही उपस्थित होते. या बैठकीला 48 तास होत नाहीत तोच त्या बैठकीला उपस्थित असलेल्या संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. आदित्य ठाकरेंच्या दाव्याला दुजोरा देताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतही असाच प्रकार सुरू असल्याचं विधान केलं.

अधिक वाचा  : या स्टार किड्सला नाही आवडत अभिनय क्षेत्र

एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला होता. भाजपबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, असं सांगत एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले होते, असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला होता. हीच रीघ ओढत राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीमध्येही असाच प्रकार भाजप करत आहे, त्यांना ईडीचा धाक दाखूवन पक्षात बंड घडवून आणू पाहत आहे. 

याचदरम्यान अजित पवार यांची भाजप नेत्याची वाढलेली जवळीकता देखील महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणारी आहे. दोन दिवसापूर्वी अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाविषयी ट्विट केलं होतं. त्या ट्विटनुसार, भाजपचा हा पुढील प्लान आहे. दमानिया यांच्यामते, त्या कामानिमित्त मंत्रालयात गेल्या होत्या. तिथे एका माणसाने त्यांना थांबवले आणि त्यांना एक मनोरंजक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच शिवसेनेचे 15 आमदार अपात्र ठरतील आणि अजित पवार भाजपसोबत जातील. 

अधिक वाचा  : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी

असा अंदाज बांधण्यासही काही कारणे आहेत. विरोधक पंतप्रधान मोदी यांच्या शिक्षणाचा पदवीवरुन  मोदींवर टीका करत असताना अजित पवार यांनी त्याच्या कामाचं कौतुक केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत नाहीत. तर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सरकारी सुरक्षा सोडली आणि अचानक ते पोहोचले नाहीत. त्यानंतर फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खिचडी शिजत असल्याची चर्चा पुन्हा रंगली होती. 

अधिक वाचा  :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करणारे HD Images

आता नुकतेच जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा प्रकरणातून अजित पवार यांचे नाव आरोपपत्रात गायब करण्यात आले आहे. याप्रकरणाची  ईडी चौकशी करत होती. ईडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले. त्यात अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे नाहीत. अजित पवार भाजपमध्ये येण्यामागे हेही एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला वाजवा लोकप्रिय गाणी

सर्वात आधी 201 मध्ये  विधानसभेचा निकाल लागला होता त्यावेळी भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार यांना सिंचन घोटाळाप्रकरणी क्लिन चीट मिळाली होती. दरम्यान,  अजित पवार यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली. भाजप आपल्या विरोधातील पक्षाला विविध मुदद्यांनी लक्ष्य करत त्याना कमजोर करते. तपास यंत्रणा सीबीआय, ईडी आदी संस्थांच्या मदतीने  भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकवत असते. भाजपसोबत न गेल्यास नेत्यांवर खोटे आरोप केले जातात, त्यांना चौकशीच्या जाळ्यात ओढलं जातं, असा आरोप आरोप संजय राऊत यांनी अनेकवेळा केला आहे. 

शिवसेनेतील शिंदेंचे बंड देखील भाजपने ईडीचा धाक दाखवून घडवून आणला. शिंदे गटातील अनेक आमदारांविरोधात ईडीच्या कारवाया सुरू आहेत. शिंदे यांना देखील तुरुंगात टाकण्याचा धाक दाखवून बंड करण्यास प्रवृत्त करण्यात आलं होतं. तोच कित्ता राष्टवादी पक्षात गिरावला जात असल्याचं राऊत म्हणालेत. 

अधिक वाचा  :  कशी कराल खऱ्या आणि खोट्या हिऱ्याची पारख?

यामुळे भाजप अजित पवार यांना दोष मुक्त करत आपल्या जाळ्यात ओढून महाविकास आघाडी आणि एनसीपीला रडवणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर अजित पवार भाजपकडे जात असतील तर त्यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देणार?  त्या घटनेला कसं हाताळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


 
दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही सध्या महाविकास आघाडीपासून काहीसे नाराज झालेले दिसत आहेत. जेपीसीचा मुद्दा असो, पंतप्रधानांच्या पदवीचा मुद्दा असो, सावरकरांचा मुद्दा असो की उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा असो. या विषयांवर शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगवेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे अजित दादांची भाजपकडील कूच ही शरद पवार यांच्या सहमतीने होत आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. जर तसं असेल तर राजकारणातील पुढील काळ हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी