मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) सत्तेत आल्यानंतर काही काळ झाल्यानंतर सरकार (government)पडणार मध्यवधी निवडणुका लागणार अशा बातम्या येत होत्या. त्यानंतर काही दिवसांनी सरकार पडलं आणि सत्तेत शिंदे-फडणवीस सरकार( Shinde-Fadnavis Govt) आलं. आत्ताही परत सरकार पडणार आणि मध्यवधी निवडणुका (Midterm Poll) लागणार असल्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे. नुकतेच महाराष्ट्र (Maharashtra)चे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)राज्यात मध्यावधी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. (Shinde-Fadnavis government can fall anytime, be ready for mid-term elections-Uddhav Thackeray)
अधिक वाचा : मोठी बातमी... विश्वचषकातून ऑस्ट्रेलिया बाहेर
ठाकरे गटाची शिवसेना (Shivsena) राज्यातील सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे संकेत दिले आहेत. मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज राहून तयारीला लागा, असे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. उद्धव ठाकरेंच्या मते राज्यात कधीही मध्यवधी निवडणुका (Midterm Poll) लागू शकतात. या संकेतानंतर मध्यवधी निवडणुका होतील या चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक मोठे प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. ही अशी विधाने आणि प्रलोभने निवडणुकीच्या काळात अनेकदा दिली जातात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या अंदाजानुसार महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे आपण तयारीत कोणतीही कसर सोडू नये.
अधिक वाचा : D Gang: दाऊद इब्राहिम-छोटा शकीलविरुद्ध NIAची मोठी कारवाई
खासदार अरविंद सावंत यांनीही उद्धव ठाकरेंच्या मुद्याचा पुनरुच्चार करत राज्य मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने जात असल्याचं म्हटलं . अरविंद सावंत म्हणाले की, अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेल्यानंतर राज्यासाठी 200 कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प राज्यातच आहेत. जेव्हा जेव्हा प्रकल्पाची घोषणा होते तेव्हा मध्यावधी निवडणुकांचे संकेत मिळतात. शिवसेना नेते उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या की, पक्षप्रमुखांकडून अनेक आदेश दिले जातात, त्यापैकी एक हा आहे. हे असे संकेत दिवंगत बाळासाहेब ठाकरेही देत असायचे. मग ते निवडणुकीविषयी असो किंवा मतदारसंघाबाबत लहानसहान बाबीही वरिष्ठांपर्यंत पोचवल्या जातात. गेल्या 50 वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे.
मनीषा कायंदे म्हणाल्या की, शिवसैनिक चोवीस कामे करतात. फक्त निवडणुका आल्या म्हणूनच शाखा उघडतात असं नाही. निवडणुकीसाठीच काही लोकांच्या शाखा आणि कार्यालये उघडत असतात, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत तसे नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहोत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.