मोठी बातमी ! मविआ नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काढली तर मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ

Maharashtra Politics news: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मविआच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • शिंदे सरकारकडून मविआच्या महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली
 • मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ तर जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा जैसे थे

MVA leaders security withdrawn: महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मविआच्या मोठ्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. मात्र, असे असतानाच मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. (Shinde Fadnavis government withdrawn security of mva leaders but milin narvekar security increased read details in marathi)

वरुण सरदेसाई यांची सुरक्षा पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. छगन भुजबळ, नाना पटोले, बाबासाहेब थोरात, नितीन राऊत, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, सुनील केदार यांची सुरक्षा काढण्यात आली आहे.

हे पण वाचा : या दोन राशींचे जोडपे असते सर्वात CUTE

महाविकास आघाडीच्या या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असताना दोन नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाहीये. यामध्ये मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. तर मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे एक्स सुरक्षा व्यवस्था होती. आता मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करुन वाय प्लस एस्कॉर्ट अशी करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

या नेत्यांची सुरक्षा काढली

 • छगन भुजबळ
 • नाना पटोले
 • जयंत पाटील 
 • वरुण सरदेसाई 
 • बाळासाहेब थोरात
 • धनंजय मुंडे 
 • भास्कर जाधव 
 • नवाब मलिक
 • सतेज पाटील
 • नरहरी झिरवळ
 • सुनील केदार 
 • नितीन राऊत 
 • विजय वडेट्टीवार 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी