'ईडी' चा महाराष्ट्रभर दौरा, ठाकरे गटाच्च्या बाल्लेकिल्ल्यावर असणार नजर

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 26, 2022 | 16:53 IST

येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत, यामध्ये मुंबईचा समावेश आहे. भाजपसह सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात एवढा मोठा पाऊस पडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली.

Shinde-Fadnavis joint Maharashtra tour from Saturday
शिंदे- फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित महाराष्ट्र दौरा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होणार आहे.
  • उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी शिंदे- फडणवीस हे एकत्रिपणे राज्याचा दौरा करणार
  • येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत.

मुंबई :  बंड केल्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी  मुख्यमंत्री (Chief Minister) पद मिळवलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात ईडी अर्थात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार आले. हे सरकार येऊन तीन महिने झाले परंतु मंत्रिमंडळाचा  (Maharashtra Cabinet Expansion) दुसरा विस्तार झालेला नाही. विस्तार होत नसल्यानं बंड करणाऱ्या आमदारांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. अशात उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ लवकरच करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर लगेच दौरा केला जाणार आहे.  (Shinde-Fadnavis joint Maharashtra tour from Saturday)

 अधिक वाचा  : थंड झालेल्या सॅण्डविचमुळे सरावानंतर सिडनीत तापलं वातावरण

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा  करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ताकद परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत.  अलीकडे त्यांनी औरंगाबदचा दौरा केलाय.दरम्यान उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी  शिंदे- फडणवीस हे एकत्रिपणे राज्याचा दौरा करणार आहेत. शनिवारपासून नंदुरबारमधून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 

 अधिक वाचा  : महाकाय अजगरानं 54 वर्षाच्या महिलेला दोन तासात गिळलं

 मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील झाली. त्यामुळे आता  उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच शिंदे फडणवीस महाराष्ट्र दौरा करणार आहेत.  ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात करणार शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत, यामध्ये मुंबईचा समावेश आहे. भाजपसह सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात एवढा मोठा पाऊस पडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच गुंग आहेत,अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी  केली आहे. 

मंत्रिमंडळाचा विस्तार होणार 

प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी तारीख स्पष्ट केली नसली तरी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे निश्चितपणे पत्रकारांना सांगितले. सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. सध्या 18 जणांना मंत्री करण्यात आले आहेत. त्यामध्ये शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या 9 जणांना मंत्रिपद देण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी