Cabinet: शिंदे-फडणवीसांचं पुरुषप्रधान मंत्रिमंडळ, एकाही महिला आमदाराला स्थान नाही

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 09, 2022 | 14:33 IST

Shinde-Fadnavis Male dominated Cabinet: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला स्थान देण्यात न आल्याने विरोधक आता त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.

shinde fadnavis male dominated cabinet has no place for a single woman mla
Cabinate: शिंदे-फडणवीसांचं पुरुषप्रधान मंत्रिमंडळ, एकाही महिला आमदाराला स्थान नाही  
थोडं पण कामाचं
  • राजभवनावर पार पडला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
  • शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्व १८ पुरुष आमदारांना मंत्रिपद
  • शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान नाही

No place for a single woman MLA: मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. पहिल्या टप्प्यातील या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी ९-९ जणांनी शपथ घेतली. मात्र, आता शिंदे-फडणवीसांच्या या मंत्रिमंडळावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. हे मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याची टीका सुरु झाली आहे. कारण १८ जणांमध्ये एकाही महिला आमदाराचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळेच आता विरोधकांनी या मुद्द्यावरुन टीका सुरु केली आहे. (shinde fadnavis male dominated cabinet has no place for a single woman mla)

यशोमती ठाकूरांची टीका

राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना जाणीवपूर्वक डावलले गेल्याकडे लक्ष वेधतानाच शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का? असा खोचक प्रश्न काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

अधिक वाचा: संजय राठोडांना मंत्रिपद, भाजपच्या चित्रा वाघ संतापल्या

९ ऑगस्ट क्रांतिदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी गौरव पद यात्रेनिमिताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 

एकाही महिलेला मंत्रीपदी संधी दिली नाही, हे आश्चर्य आहे. तर भाजप नावाची वॉशिंग पावडर चारित्र्य साफ करत असल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

याचवेळी त्यांनी आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता भाजपच्या चित्रा वाघ यांची भूमिका काय असेल? असा सवाल केला.

अधिक वाचा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही आमदार?

जाणून घ्या कोणी-कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ

शिंदे गटातील मंत्री 

  • उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय राठोड, दीपक केसरकर, तानाजी सावंत 

भाजपकडून यांनी घेतील मंत्रिपदाची शपथ 

  • चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनंगटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

अधिक वाचा: Cabinet: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 'यांना' मिळालं मंत्रिपद

पंकजा मुंडेंना डच्चू

दरम्यान, भाजपने या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना संधी दिली. पण यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना मात्र डच्चू दिला. पण भाजपने आता संधी दिलेले सर्व नेते हे विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. त्याबाबतीत पंकजा मुंडे या कमी पडल्या आहेत. तसेच त्या सध्या कोणत्याही सभागृहात नाहीत त्यामुळेही त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणं त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना सोप्पं गेलं आहे. 

पंकजा मुंडे या सुरुवातीला महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीमधील प्रमुख सदस्य होत्या. मात्र, २०१९ ला त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पक्षाने त्यांचे वेळोवेळी पंख छाटले. ज्यामुळे आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं नावंही साधं चर्चेत आलं नाही. मात्र, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भाजप त्यांना स्थान देतं का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी