Thackeray vs Shinde: शिंदे गटाची पहिली शाखा सुरू; खासदार राहुल शेवाळेंच्या मतदारसंघात उद्घाटन

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 13, 2022 | 15:41 IST

Shinde Group shakha in Mumbai: शिंदे गटाने आपली पहिली शाखा सुरू केली आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरात ही शाखा सुरू करण्यात आली आहे. 

Shinde Group first shakha branch open by MP Rahul shewale in mankhurd mumbai
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (फाईल फोटो) 
थोडं पण कामाचं
  • शिंदे गटाची पहिली शाखा मानखुर्दमध्ये 
  • खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून शाखा सुरू
  • शाखेच्या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा फोटो नाही

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाची पहिली शाखा मुंबईत सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरात ही शाखा सुरू करण्यात आली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने ही शाखा सुरू करण्यात आली आहे. एकीकडे प्रति शिवसेना भवन उभारण्याची जोरदार चर्चा आहे आणि त्या संदर्भात शिंदे गटाकडून दादरमध्ये जागा सुद्धा निश्चित केली असल्याचं बोललं जात आहे. त्याच दिशेने आता पहिलं पाऊल पडलं आहे. कारण, शिंदे गटासोबत असलेल्या खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून शिंदे गटाची पहिली शाखा सुरू करण्यात आली आहे.

बॅनरवर उद्धव ठाकरेंच्या फोटोला स्थान नाही

शिंदे गटाकडून सुरू करण्यात आलेल्या या शाखेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राहुल शेवाळे यांचे फोटो आहेत. मात्र, या बॅनरवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो नाहीयेत.

अधिक वाचा : राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर,पहा वेळापत्रक

प्रत्येक वॉर्डमध्ये शाखा सुरू करणार 

शिंदे गटाची ही पहिली शाखा मानखुर्दमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये अशाच प्रकारची शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

दादरमध्ये प्रति शिवसेना भवन

तर दुसरीकडे शिवसेना भवन असलेल्या दादर परिसरात शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलं, "तुम्ही त्याला सेना भवन म्हणा किंवा प्रति सेनाभवन म्हणा.... पण नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एखादे कार्यालय बनवण्यात येणार आहे. कुणी त्याला शिवालय म्हणेल, कुणी शिवसेना भवन म्हणेल... मला असं वाटतं काम करण्यासाठी शिवसेना भवनच हवं किंवा तेच नाव हवे असं काही नाही. या शिवसेना भवनातून आम्ही आतापर्यंत काम करत आलो आहोत. शिंदे साहेबांना भेटण्यासाठी जे लोक येणार आहेत त्यांना भेटण्यासाठी एक कार्यालय हवं आणि ते कार्यालय दादर विभागात बनवलं जाणार आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी