Bachchu Kadu: 'बच्चू कडूंनी थोडी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी', दीपक केसरकरांनी दिला सल्ला

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 11, 2022 | 14:06 IST

Minister Deepak Kesarkar advised Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी त्यांना अतिशय चांगलं खातं मिळेल. असं नवनियुक्त मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

shinde group minister deepak kesarkar advised bachchu kadu should have some faith and patience on his displeasure
बच्चू कडूंनी थोडी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी: दीपक केसरकर 
थोडं पण कामाचं
  • दीपक केसरकरांचा बच्चू कडू यांना सल्ला
  • बच्चू कडू यांना मंत्रिपद न मिळाल्याने व्यक्त केलेली नाराजी
  • दीपक केसरकरांची शिवसेनेवर टीका

Deepak Kesarkar: मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Govt) नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. ज्यामध्ये एकूण १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. पण यावेळी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना डावलण्यात आल्याने त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. ज्यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बच्चू कडू यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे. दीपक केसरकर यांच्यासह शिंदे गटाच्या काही आमदारांनी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. ज्यानंतर केसरकरांनी माध्यमांशी संवाद साधला. (shinde group minister deepak kesarkar advised bachchu kadu should have some faith and patience on his displeasure)

'बच्चू कडूंनी सबुरी ठेवावी'

दरम्यान, यावेळी दीपक केसरकर यांना बच्चू कडू यांच्या नाराजीबाबत सवाल विचारण्यात आल्यानंतर ते असं म्हणाले की, 'बच्चू कडू आमच्या मित्र पक्षाचे नेते आहेत. त्यांचा योग्य तो मान ठेवला जाईल. लवकरच आम्ही काही मंत्री जाऊन त्यांची भेट सुद्धा घेऊ. अतिशय चांगलं खातं हे बच्चू कडू यांना मिळालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मी तर स्वत: साईबाबांचा भक्त आहे. श्रद्धा आणि सबुरी. थोडीशी सबुरी ठेवायला लागते. त्यातू मिळणारं फळ हे अतिशय गोड असतं.' असा सल्लाच केसरकरांनी कडू यांना दिला आहे. 

अधिक वाचा: शिंदे गटातील या आमदारांना मंत्रिपद देण्यास भाजपचा होता विरोध

'आमच्या वाट्याला नऊ मंत्रिपदं आली त्यातील सात जणं हे आधीच मंत्री होते. त्यांना संधी देणं गरजेचं होतं. नाहीतर लोकांना वाटलं असतं की, शिवसेनेचे लोकं मंत्रिपद सोडून आले आणि पहिल्या विस्तारात त्यांना संधी मिळाली नाही. मग आमच्याकडे पदं किती शिल्लक राहतात. म्हणून मी भरतशेट गोगावलेंचं उदाहरण दिलं.' असं सांगत आपली नेमकी काय अडचण आहे ते देखील केसरकर यांनी यावेळी सांगितलं. 

'..म्हणून संजय राठोडांना मंत्रिपद दिलं'

'संजय राठोड यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. अशावेळी त्यांना किती काळ त्यांच्या कर्तव्यापासून वंचित ठेवणार? काऱण ते एका मागासलेल्या समाजाचं त्यांच्या आशा-आकांक्षाचं प्रतिनिधित्व ते करतात. अशावेळी त्यांच्या समाजाची मागणी होती की, त्यांच्यावर जर आरोप नसतील तर त्यांना स्थान द्यायला हवं. तसं न केल्यास तुम्ही आमच्या समाजावर देखील अन्याय करत आहात. या सगळ्याचा विचार करुन त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.'

अधिक वाचा: 'भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली', मोदींचा गौप्यस्फोट

'आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की, भरत गोगावले आणि मी असे दोन पर्याय होते शिंदे साहेबांसमोर. माझी निवड झाली म्हणून गोगावले साहेब कुठेही नाराज झाले नाही. पण दुसऱ्या टप्प्यात नक्कीच त्यांचा विचार केला जाईल. आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढंही सांगितलं आहे की, आम्हाला कुठलंही खातं द्या त्या खात्यात आम्ही काम करु.' असंही दीपक केसरकर हे यावेळी म्हणाले. 

'शिवसेनेत आमदार परत जातील हे आता दिवास्वप्न आहे' 

'आमच्यात काही नाराज आहेत आणि ते पुन्हा शिवसेनेत जातील अशी जी काही चर्चा आहे ती फक्त अफवा आहे. त्या वेडी आशा, दिवास्वप्न असतात. आम्ही जेव्हा गुवाहटी किंवा गोव्यात होतो तेव्हा सांगण्यात येत होतं की, सगळे आमदार परत येतील. पण त्यांचे आमदार कमीच होत गेले आहेत. त्यामुळे कोणीही परत जाणार नाही.'

अधिक वाचा: 'भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो', शरद पवारांची खोचक टीका

'आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी कार्यभार स्वीकारायचा बाकी आहे. आम्हाला जी खाती मिळतील त्याचा कार्यभार स्वीकारू. पण त्याआधी बाळासाहेबांचं दर्शन घेणं हे आमच्या सर्वांसाठी आवश्यक होतं.  कारण त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. म्हणून आम्ही आज स्मृतीस्थळी येऊन त्यांचे दर्शन घेतले.' असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले. 

बच्चू कडूंची काय होती नाराजी? 

पहिल्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे शिंदे गटावर खूपच नाराज आहेत. कारण उद्धव ठाकरेंविरोधात जे बंड करण्यात आलं होतं. त्या बंडाच्या पहिल्या दिवसापासून बच्चू कडू हे शिंदेंसोबत होते. अशावेळी पहिल्या विस्तारात त्यांना संधी देण्यात आली नसल्याने ते खूपच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. 

अधिक वाचा: राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निर्णय पुन्हा लांबणीवर

माध्यमांशी बोलताना बच्चू कडू असं म्हणाले की, 'जे सगळ्यात शेवटी आले त्यांना पहिल्या पंगतीला बसवलं. पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा ४५ दिवसांनी झाला. दुसरा विस्तार बहुदा अडीच वर्षानेच होईल.' अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी