Eknath Shinde:  शिंदे गटाचे एक पाऊल मागे, शिवाजी पार्कसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही

Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून शिंदे गट एक पाऊल मागे आले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. आता शिंदे गट या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार नाही. शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानाची परवानगी मिळाली असून शिंदे गटाने जोरदार तयारीही केली आहे.

uddhav vs shinde
ठाकरे वि. शिंदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दसरा मेळाव्यावरून शिंदे गट एक पाऊल मागे आले आहे.
  • शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला परवानगी दिली आहे.
  • आता शिंदे गट या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार नाही.

Dasara Melava : मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिंदे गट एक पाऊल मागे आले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. आता शिंदे गट या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार नाही. शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानाची परवानगी मिळाली असून शिंदे गटाने जोरदार तयारीही केली आहे. (shine group not challenge in supreme court high court decision on shivaji park dasara melava)

अधिक वाचा : अजित पवारांनी फडणवीसांच्या कार्यक्षमतेची चिंता करू नये!: महाजन

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटाने आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगत पक्षाच्या निवडणूक चिन्हावरही दावा केला होता. तसेच आपलीच खरी शिवसेना असे सांगत शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचेही ठरवले होते. त्यासाठी शिंदे गटाने आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदानासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. परंतु कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. अखेर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने शिंदे गट, ठाकरे गट आणि पालिकेची बाजू ऐकत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर शिवसेनेने एकच जल्लोष केला होता. 

अधिक वाचा :  Shocking Video: भरधाव डंपरची अनेक गाड्यांना धडक, वाशी टोल नाक्यावरील घटनेचा LIVE VIDEO

या निकालानंतर शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाईल असे सांगण्यात येत होते. परंतु दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. केसरकर म्हणाले की ठाकरे गटाकडून अफवा पसरवल्या जात आहेत. आधी परवानगी कोणी मागितली यावर निर्णय देण्यात आला आहे. आम्हाला परवानगी हवी असती तर ती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मिळाली असती. असे असले तरी आता शिवाजी पार्कसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही असे केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच  हा विषय आमच्यासाठी संपला आहे असेही केसरकर म्हणाले. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

अधिक वाचा : Dhananjay Munde | लोकशाहीमध्ये बोलताना भान ठेवून बोलावे - धनंजय मुंडे

उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतरही ही परंपरा सुरू आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळाव्याची मोठी तयारी केली आहे. बीकेसीवरील एमएमआरडीएचे मैदान हे शिवाजी पार्कपेक्षा मोठे आहे त्यामुळे ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्या तिप्पट गर्दी होईल असा दावा शिंदे गटाचे अमादार दादा भूसे यांनी केला आहे. 

अधिक वाचा : Supriya Sule : बारामतीतील भरकार्यक्रमात गोंधळ, ताईच्याच समोर भिडले दोन गट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी