Sameer Wankhede Vs Malik : वानखेंडेच्या पाठिशी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, एनसीबीच्या कार्यालयासमोर समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी अन् सत्कार

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 03, 2021 | 12:17 IST

Sameer Wankhede Vs Malik  :  एनसीबीचे (NCB) मुंबई विभागीय संचालक (Mumbai Divisional Director)  समीर वानखेडे (Sameer Wankhede)  सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) आणि एकूणच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) रडारवर आहेत.

Shiv Pratishthan Yuva Hindusthan reception to Sameer Wankhede
वानखेंडेच्या पाठिशी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान (Shiv Pratishthan Yuva Hindusthan) मैदानात
  • समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी करत त्यांना छत्रपती शिवरयांची एक प्रतिमा भेट देण्यात आली.
  • नवाब मलिकांविरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना आंदोलनं करणार

Sameer Wankhede Vs Malik  : मुंबई :  एनसीबीचे (NCB) मुंबई विभागीय संचालक (Mumbai Divisional Director)  समीर वानखेडे (Sameer Wankhede)  सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) आणि एकूणच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) रडारवर आहेत. दिवसेंदिवस ते वानखेडेंवर आरोप करत आहेत. मलिकांच्या या आरोपांना वानखेडेंही जोरदार उत्तर देत आहेत. आता समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान (Shiv Pratishthan Yuva Hindusthan) मैदानात उतरली आहे. आज एनसीबीच्या मुंबई कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. 

समीर वानखेडेंवर एकापाठोपाठ एक आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही आता आंदोलने होऊ लागली आहेत. आज बुधवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, नेमक्या त्याचवेळी कार्यालयात दाखल होणाऱ्या समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी करत त्यांना छत्रपती शिवरयांची एक प्रतिमा भेट देण्यात आली. समीर वानखेडेंनी या सर्व गोष्टींचा स्विकार केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. वानखेडेंचा सत्कार केल्यानंतर या संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली. 

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले म्हणाले की, "नवाब मलिक हे केवळ एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करत आहेत. ड्रग्जच्या व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या मलिकांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. नवाब मलिकांविरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना यापुढेही अशीच आंदोलनं करत राहील."

समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर नवाब मलिकांचा निशाणा

मुंबई क्रूझ ड्रग (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणाला नवं वळण लागले असून यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे खुलासे करतात. नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना समीन वानखेडेंवर टीकास्त्र डागले. यावेळी नवा बॉम्ब फोडताना नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे (Sameer Wankhede) सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. 

नवाब मलिकांनी बोलताना म्हटलं की, "समीर वानखेडेंचे सर्व फोटो तुम्ही पाहा. त्यांचे बूट पाहा. louis vuitton चे बूट दोन-दोन, तीन-तीन लाखांचे आहेत, ते जे बदलत असतात. त्यांचे शर्ट पाहाल तर त्यांची किंमत 50 हजारांपासून सुरु होते. टी शर्ट पाहिलं तर त्याची किंमत 30 हजार रुपयांपासून सुरु होते. वानखेडेंच्या हातातील घड्याळं दररोज बदलतात, ज्यांची किंमत 20 हजारांपासून सुरु होते, ती 1 कोटींपर्यंत किमतीची आहेत. एका प्रमाणिक अधिकाऱ्याचं हे राहनीमान? मी प्रार्थना करतो की, देशातील सर्व प्रामाणिक लोकांचं राहणीमान असंच व्हावं."

महागड्या पेहरावावरुन आरोप करणाऱ्या नवाब मलिका यांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या महागड्या कपड्यांची फक्त अफवा आहे, मलिकांना त्याविषयी कमी माहिती आहे. त्यामुळे त्यांनी खरी माहिती शोधून काढावी, असं आव्हान समीर वानखेडेंनी मलिकांना दिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी