Shiv Sainik suffering : 'महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांचं नुकसान होतंय'

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 19, 2021 | 20:33 IST

Shiv Sainik are suffering due to Mahavikas Aghadi government said shivsena MP : महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांचं नुकसान होतंय; असं वक्तव्य शिवसेनेच्या खासदारानं केलंय. शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी जाहीरपणे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारबाबतची नाराजी व्यक्त केली.

Shiv Sainik are suffering due to Mahavikas Aghadi said Shivsena MP Hemant Patil
'महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांचं नुकसान होतंय' 
थोडं पण कामाचं
  • 'महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांचं नुकसान होतंय'
  • शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी जाहीर केली नाराजी
  • महाविकास आघाडी सरकारबाबतची नाराजी

Shiv Sainik are suffering due to Mahavikas Aghadi government said shivsena MP : मुंबई : महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांचं नुकसान होतंय; असं वक्तव्य शिवसेनेच्या खासदारानं केलंय. शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी जाहीरपणे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारबाबतची नाराजी व्यक्त केली.

ऐकलं का! गुलाबराव पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखी केले

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘आम्ही आहोत, म्हणून सत्ता आहे’, असे सांगितले होते. यानंतर रामदास कदम यांनी राज्य शासनात मंत्री असलेल्या स्वपक्षीय अनिल परब यांच्यावर टीका केली. राज्याच्या सत्तेत असूनही शिवसेनेचा राजकीय लाभ होत नाही. शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घुसखोरी करू पाहतोय; अशा स्वरुपाचे आरोप रामदास कदम यांनी केले. या आरोपांना २४ तास उलटत नाहीत तोच शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारबाबतची नाराजी व्यक्त केली.

ramdas kadam criticised anil parab : अनिल परब गद्दार, रामदास कदमांचा आरोप

उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे, म्हणून हे सगळ सहन करत आहे; असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून १०० टक्के शिवसैनिकांचेच नुकसान होत आहे. वरिष्ठांच्या कानावर वारंवार या गोष्टी घातल्या आहेत; असेही हेमंत पाटील म्हणाले. 

याआधी एक पत्र लिहून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचे नुकसान होत असल्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवले होते. तर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा घात करण्यात आला, असा आरोप शिवसेनेचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा कोकणातील मतदार संघ गिळंकृत करत आहे, असा आरोप रामदास कदम यांनी केला होता. आता खासदार हेमंत पाटील यांनीही महाविकास आघाडीविषयी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनेतच नाराजी वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी