Shiv Sena Bhavan : मुस्लिम व्यक्तीच्या जागेवर बांधले शिवसेना भवन, जाणून घ्या कोण होता मूळ मालक?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 21, 2023 | 18:14 IST

Shiv Sena Bhavan built on the site of a Muslim, know who was the original owner? : शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असतानाच शिवसेना भवन हा नवा विषय चर्चेत आला आहे.

Shiv Sena Bhavan built on the site of a Muslim
मुस्लिम व्यक्तीच्या जागेवर बांधले शिवसेना भवन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुस्लिम व्यक्तीच्या जागेवर बांधले शिवसेना भवन
  • जाणून घ्या कोण होता मूळ मालक?
  • शिवसेना भवनची जागा नेमकी कोणाची?

Shiv Sena Bhavan built on the site of a Muslim, know who was the original owner? : शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भारत निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची या वादावर त्यांचा निकाल दिला आहे. आयोगाच्या निकालाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असतानाच शिवसेना भवन हा नवा विषय चर्चेत आला आहे. 

मराठी आणि हिंदुत्व या मुद्यांवरून अनेक वर्ष राजकारण करणाऱ्या शिवसेनेने पक्षाच्या मुख्यालयासाठी एका मुस्लिम व्यक्तीसोबत डील केले. या डीलमुळे 1974 मध्ये शिवसेनेला मुंबईत दादर येथे मोक्याच्या जागेवर हक्काचे घर मिळाले. हेच ते शिवसेनेचे शिवसेना भवन.

शिवसेना भवन ज्या जागेवर उभे आहे ती जागा मूळची एका मुस्लिम व्यक्तीची होती. उमेर नावाच्या व्यक्तीकडे जमीन होती. या उमेरकडून जमीन शिवसेना भवन उभारण्यासाठी घेण्यात आली. शिवसेना भवनाच्या निर्मितीआधीपासून त्या भागात काही दुकानं होती. सेना भवनात या दुकानदारांना सामावून घेण्यात आले. 

ख्यातनाम आर्किटेक्ट गोरे यांच्या संकल्पनेतून बाहेरून किल्ल्यासारखे दिसणारे मजबूत शिवसेना भवन उभे राहिले. हे भवन उभे राहावे यासाठी शिवसैनिकांनी निधी उभारला. यासाठी ऑफिसांमध्ये जाऊन देणगीच्या पावत्या फाडण्यात आल्या. कोणी फरशीचे काम केले तर कोणी फर्निचरचे. या पद्धतीने कार्यालय सज्ज झाले. 

मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेना भवनच्या भूखंडाचा ताबा कोणाकडे याची माहिती मिळवली. ही माहिती त्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केली आहे. ट्वीट करताना 'शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच की ???' असे वाक्य टाइप केले आहे. या वाक्यातून संदीप देशपांडे नेमके काय सांगू बघत आहेत यावरूनही चर्चेला उधाण आले आहे.

Arogya Vibhag Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई मनपा अंतर्गत रिक्त पदांवर भरती, जाणून घ्या पद आणि पगार किती मिळेल

Water Cut In Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 4 दिवस पाणीकपात

शिवसेना भवनची जागा नेमकी कोणाची? Who exactly owns land of Shiv Sena Bhawan?

शिवसेना भवन ज्या जागेवर उभे आहे ती जागा मूळची उमेर नावाच्या मुस्लिम व्यक्तीची होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशा प्रकारे उमेरच्या कुटुंबातच जागेची मालकी हस्तांतरित होत होती. पुढे 1999 मध्ये उमेर कुटुंबाकडून शिवसेना भवन ज्या जागेवर आहे त्या जागेचा ताबा श्री शिवाई सेवा ट्रस्टकडे आला. 

ट्रस्टचे पदाधिकारी म्हणून डॉ. हेमचंद्र शंकर गुप्ते, मीनाताई बाळासाहेब ठाकरे, वामन शिवराम महाडिक, माधव गजानन देशपांडे, सुधीर गजानन जोशी, लिलाधर बाळाजी डाके, शाम जयवंत देशमुख, कुसुम गजानन शिर्के, भालचंद्र कृष्णा देसाई यांनी काम केले. यापैकी  शाम जयवंत देशमुख, कुसुम गजानन शिर्के, भालचंद्र कृष्णा देसाई यांनी काही काळानंतर ट्रस्टच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला. डाके वगळता उर्वरित पदाधिकाऱ्यांचे निधन झाले. यथावकाश ट्रस्टवर नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली. रविंद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, विशाखा राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते हे ट्रस्टवर नवे पदाधिकारी म्हणून आले. काही वर्षांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे ट्रस्टवर आले. अशा प्रकारे शिवसेना भवन ज्या ठिकाणी आहे त्या भूखंडाचा प्रवास मुस्लिम व्यक्तीकडून शिवाई ट्रस्टकडे झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी