उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार, अयोध्यावारीसाठी 'हा' दिवस केला निश्चित

मुंबई
Updated Nov 09, 2019 | 17:32 IST

Uddhav Thackeray Ayodhya: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या २४ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येला जाणार आहेत. त्याबाबतची माहिती त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

shiv sena chief uddhav thackeray will visit ayodhya again on november 7 latest update
उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार, अयोध्यावारीसाठी 'हा' दिवस केला निश्चित   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • 'आजच्या दिवशी बाळासाहेबांची आठवण येणं साहिजक आहे' 
 • 'येत्या २ ते ३ दिवसात मी शिवनेरीवर जाऊन शिवरायांना वंदन करणार'
 • 'येत्या २४ तारखेला पुन्हा मी अयोध्येला जाणार'

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. याबाबत स्वत: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरांच्या निकालाबाबत आपलं मत व्यक्त केलं. 'आजचा दिवस सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे. हा भारताच्या इतिहासातील सोनेरी क्षण आहे.' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपला आनंद व्यक्त केला. दरम्यान याचवेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, ते येत्या २४ नोव्हेंबरला पुन्हा एकदा अयोध्येत जाणार आहेत. 

'येत्या २ ते ३ दिवसात मी शिवनेरीवर जाऊन शिवरायांना आणि शिवनेरीवरील पवित्र मातीला वंदन करणार आहे. तसंच अयोध्येतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती योग्य असेल तर येत्या २४ तारखेला पुन्हा मी तिथे जाणार आहे. कोर्टाने दिलेल्या निकालानंतर आपला आनंद जरुर साजरा करा पण कुणालाही त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मी काल राजकारणावर बोललो, उद्या पण बोलेल. पण आजचा दिवस आनंदाचा आहे. असे दिवस कमी येतात.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: 

 1. सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आजचा दिवस आहे
 2. भारताच्या इतिहासातील सोनेरी क्षण 
 3. सर्व धर्मीयांचे मी आभार मानतो, सगळ्यांनी न्यादेवतेचा निकाल मान्य केला आहे 
 4. राम जन्मभूमीचा वाद आता संपला आहे. 
 5. बाळासाहेबांची आठवण येणं साहिजक आहे. 
 6. ज्यावेळी हिंदुत्वाबद्दल बोलण्यास लोकं घाबरत होते तेव्हा बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला. 
 7. मला आज प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अशोक सिंघल आणि अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण येते 
 8. अडवाणींनी रथ यात्रा सुरु करुन याबाबत आवाज उठवला होता. आता अडवाणींची भेट घेणार 
 9. आम्ही महाराष्ट्रातील माती अयोध्येत नेली तेव्हा मला विश्वास होता की, या मातीमुळे चमत्कार होणार 
 10. येत्या २ ते ३ दिवसात मी शिवनेरीवर जाऊन शिवरायांना वंदन करणार 
 11. तेथील कायदा व्यवस्थेची स्थिती योग्य असेल तर येत्या २४ तारखेला पुन्हा मी अयोध्येला जाईन.      
 12. आनंद जरुर साजरा करा, पण कुणालाही त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या 
 13. मी काल राजकारणावर बोललो, उद्या पण बोलेल. पण आजचा दिवस आनंदाचा आहे. असे दिवस कमी येतात. 
 14. हा सर्वात मोठा धडा होता ते एक मोठं आंदोलन होतं. जे या आंदोलनात शहीद झाले त्यांना मी मानाचा मुजरा करतो 
 15. ओवेसी म्हणजे सुप्रीम कोर्ट नाहीत. 
 16. मी गेल्यावर्षी स्वत: तिकडे गेलो होतो, तेव्हा शिवसेनेने हा विषय ऐरणीवर आणला होता. 
 17. जर कोर्टाकडून विलंब होत असेल तर सरकारने विशेष कायदा करुन मंदिर उभारणी करावी. अशी आमची मागणी होती. 
 18. पण कोर्टाने ती वेळ येऊ दिली नाही. त्यामुळे कोर्टाचे विशेष आभार मानतो 
 19. राज्यपालांना सांगितलं की, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. आमच्याकडून त्यांना पूर्ण सहकार्य मिळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...