'फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत', शिवसेनेची बोचरी टीका 

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 21, 2019 | 09:26 IST

Saamana Editorial: शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली आहे. 

shiv sena criticized to bjp devendra fadanvis saamana editorial 
'फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत', शिवसेनेची बोचरी टीका   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सामनातून देवेंद्र फडणवीसांवर शिवसेनेची तुफान टीका
  • फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे, त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल
  • महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेस दगा दिला, शिवसेनेचा आरोप

मुंबई: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज (शनिवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विधीमंडळात नेमकं काय घडणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. मात्र, यासगळ्या दरम्यान, 'सामना'तून आज पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे. त्यामुळे त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल.' अशा शब्दात फडणवीसांवर टीका करण्यात आले आहेत. 

आजच्या सामनातील अग्रलेखातून भाजपवर प्रचंड टीका करण्यात आली आहे. 'शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले.' असं म्हणत शिवसेनेने स्पष्ट केलं आहे की, यापुढे भाजपशी कोणतंही नातं ठेवण्यात येणार नाही. 

पाहा सामनाच्या अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे: 

  • भारतीय जनता पक्षाचे 30 वर्षांचे ओझे उतरवले असल्याची शुभवार्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आता हे ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने खिडकीत बसून ‘शुक शुक’ करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजविणे बंद केले पाहिजे. 
  • ‘काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का?’ असा प्रश्न विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे. त्यामुळे त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल. 
  • भारतीय जनता पक्षाचेच नेते देशाच्या प्रश्नांवर, जनतेच्या मागण्यांवर मूग गिळून बसले आहेत. पण भावनिक विषयांवर तोंड फाटेपर्यंत बोलत आहेत. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेस दगा दिला व हे दगानाटय़ ठरल्याप्रमाणेच झाले.
  • 2014 मध्ये खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा मोठय़ा गर्वात केली. आज खडसे इतरांच्या पायऱया झिजवत आहेत. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी